पुणे ( प्रतिनिधी ) भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश महामंत्री पदी पुणे येथील राजेशजी पांडे यांची निवड करण्यात आली आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी पांडे यांच्या निवडीचे पत्र दिले त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या महत्वाकांक्षी योजना व उपक्रमांना अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी सातत्य ठेवणारे पुणे येथील प्रा. श्री. राजेश पांडे यांची महाराष्ट्र प्रदेश महामंत्रीपदी नियुक्ती करताना मला अतिशय आनंद होत आहे. श्री. पांडे यांची चौफेर संघटनशैली असून त्यांचा लाभ पक्षाला नेहमी होत असतो. त्यांनी आजवर प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी अतिशय उत्तम पार पाडली.
कुशल संघटक, अभ्यासू आणि तडफदार वक्ते असणारे पांडे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य व महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष आहे.
श्री. पांडे यांनी हर घर तिरंगा अभियान, मेरी मिट्टी मेरा देश अभियान, पुणे बुक फेस्टिवल हे अभियान यशश्वी करत त्याची जागतिक पातळीवर दखल घेतली आहे.
श्री. राजेशजी पांडे यांचे निवडी बद्दल सर्वत्र अभिनंदन होत असून भाजपा सोशल मीडिया सेल उत्तर नगर जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाकचौरे, भाजपा शिक्षक आघाडी पुणे जिल्हा संयोजक राजू पानमंद यांनी अभिनंदन केले आहे.