shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

अन्यथा सांगली पॅटर्न सारखे इंदापूर तालुक्यात ही बंडखोर उमेदवार निवडणुकीमध्ये उभा राहील - दशरथ माने यांनी इंदापूर येथे परिवर्तन मेळावा मध्ये दिले संकेत इंदापूर विधानसभेची निवडणूक तिरंगी होण्याचे संकेत.

अन्यथा सांगली पॅटर्न सारखे इंदापूर तालुक्यात ही बंडखोर उमेदवार निवडणुकीमध्ये उभा राहील - दशरथ माने यांनी इंदापूर येथे परिवर्तन मेळावा मध्ये दिले संकेत 
इंदापूर विधानसभेची निवडणूक तिरंगी होण्याचे संकेत.
 इंदापूर: शरद पवार यांनी इंदापूरच्या विधानसभेच्या जागेचा जाहीर केलेल्या उमेदवारी संदर्भात पुनश्च निर्णय घ्यावा. जाहीर करण्यात आलेली उमेदवारी रद्द करून पक्षातील ज्या कार्यकर्त्यांनी उमेदवारीची मागणी केली होती. त्यांच्यापैकी एकाला उमेदवारी द्यावी. अन्यथा सांगली पॅटर्न सारखे इंदापूर तालुक्यात ही बंडखोर उमेदवार निवडणुकीमध्ये उभा राहील. १९९५ साली बंडखोरी झाली .तेव्हा मी स्वतः होतो. त्यामुळे आमच्यासाठी हा निर्णय घेणे नवीन नाही. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांना आम्ही निवडून आणले. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची २९ सप्टेंबर रोजी बारामती येथील गोविंद बागेत आम्ही भेट घेतली. भेटीच्या वेळी शरद पवार यांना हात जोडून विनंती केली. मागणी केलेल्या उमेदवारा व्यतिरिक्त उमेदवार देऊ नका अशा शब्दात  बंडखोरीचे संकेत सोनाई परिवाराचे सर्वेसर्वा दशरथ माने यांनी आज इंदापूर येथील परिवर्तन मेळाव्यामध्ये केले. 
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी इंदापूर विधानसभेचा उमेदवार म्हणून हर्षवर्धन पाटील यांची उमेदवारी निश्चित केल्यानंतर नाराज गटाने उमेदवारी बाबद फेर विचार व्हावा तसेच जनतेचा विचार घेण्यासाठी परिवर्तन मेळाव्याचे आयोजन जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणात घेतला होता त्यावेळी दशरथ माने बोलत होते. 

या परिवर्तन मेळाव्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने, कर्मयोगी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, निराभिमा कारखान्याचे उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, तुषार जाधव,बाबासाहेब चौरे, बाळासाहेब हरणावळ, शकील सय्यद, बापू जामदार,  आर्षद सय्यद, प्रदीप जगदाळे, अमोल भोईटे, प्रताप पालवे, विजय घोगरे, विकास खिलारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आप्पासाहेब जगदाळे बोलताना म्हणाले की,इंदापूर तालुक्याच्या इतिहासामध्ये एवढी संख्या कधी जमली नसेल. एवढं प्रेम, एवढा आशीर्वाद तुम्ही आम्हाला दिलेला आहे. मी पवार साहेब, खासदार सुप्रियाताई सुळे यांना विनंती करतो की,या तालुक्यावर तुमचे प्रेम असेल या तालुक्याने कोणीही कार्यकर्ता नसताना लोकसभेला २६ हजाराचं मत अधिक्य दिलं. या जनतेवरती प्रेम असेल तर तुम्हाला उद्या निर्णय बदलावा लागेल असा शब्दात आप्पासाहेब जगदाळे यांनी शरद पवार व सुप्रिया सुळे यांना उमेदवारीच्या निर्णयासंदर्भात आपल्या भाषणातून सवाल केला आहे.
 उमेदवार नाही बदलला तर काय करायचं असा जनतेला सवाल करत आप्पासाहेब जगदाळे पुढे म्हणाले की, इंदापूरची बंडखोरी परवडणारी नाही. या बंडखोरीचा आवाज हा सर्वसामान्यांचा आहे. समोर बसलेल्या महिला भगिनींचा आहे. तरुण सहकार्यांचा आहे. वडीलधारी माणसांचा आहे. हा आवाज कोणी थांबू शकत नाही. इमानदारी व प्रामाणिकपणा महत्त्वाचा असतो. तो आमच्या मध्ये आहे. या इंदापूर तालुक्यातला माणूस हा प्रामाणिकच आहे. कोणाच्याही दबावाला बळी पडणारा नाही. नेता नसताना  सुप्रिया सुळे यांना २६ हजाराचा मताधिक्य देणारा हा तालुका आहे. हे सुद्धा लक्षात घ्या. अशा शब्दात त्यांनी बंडखोरीचे संकेत आजच्या आयोजित परिवर्तन मेळाव्यामध्ये  दिले.
----------------------------------
इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी, ना कुणाच्या स्वार्थासाठी, इंदापूर तालुक्यात परिवर्तन करायचे आहे.
ज्या मैदानामध्ये तुमच्या पराभवाची चर्चा चालू असते त्याच मैदानामध्ये आप्पासाहेब असो या आम्ही असो विजयाचा गुलाल घेतल्याशिवाय माघार घेणार नाही - प्रवीण माने

-------------------------------
इंदापूर तालुक्याला खऱ्या अर्थाने परिवर्तनाची गरज का पडली. आज इंदापूर तालुक्याला कै. शंकराव पाटील भाऊ, आणि राजेंद्रकुमार घोलप यांनी नीतिमत्तेचा व नैतिकतेच, विचाराच राजकारण केलं. त्यांनी कधीच नकारात्मक राजकारण केलं नाही. त्यांनी विकासाचे राजकारण केलं. तो विचार खऱ्या अर्थाने जनतेला हवा आहे. आणि तेच जनता मागत आहे. आजपर्यंत आजी-माजी पदाधिकारी असतील त्यांनी विकासाच्या राजकारणापेक्षा नकारात्मक राजकारण जास्त केलं. आम्ही पवार साहेब, सुप्रिया सुळे यांच्या बरोबरच आहोत .आम्ही सत्तेसाठी दल बदलूपणा करणार नाही. परंतु आपण जो निर्णय घेतलेला आहे. त्या निर्णयाचा पुन्हा एकदा फेरविचार करावा अशी या परिवर्तन मेळाव्याच्या निमित्ताने मी मागणी करतो. - इंदापूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा.
-------------------------------
इंदापूर विधानसभा निवडणूक तिरंगी होण्याचे संकेत. 

महायुतीचे उमेदवार स्टॅंडिंग आमदार म्हणून आमदार दत्तात्रय भरणे यांचे नाव येत असून महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवार  माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव स्वतः शरद पवार यांनी इंदापूर येथील सभेमध्ये निश्चित केले. तर शरदचंद्र पवार पक्षातील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे व पुणे जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती प्रवीण माने यांनी इंदापूर येथे परिवर्तन मेळावा आयोजित करून पक्षातून फेरविचार करून पक्षाकडे उमेदवारी अर्ज केल्या पैकी एकाला उमेदवारी न दिल्यास बंडखोरीचे संकेत दिले. यामुळे इंदापूर विधानसभा निवडणुकीत तिरंगी होण्याचे संकेत दिसून येत आहेत.
close