shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

डॉ. अब्दुल कलाम युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व - करण ससाणे


श्रीरामपूर / प्रतिनिधी:
माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए पी जे अब्दुल कलाम हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व होते असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केले. 

श्रीरामपूर शहर काँग्रेसच्या वतीने आयोजित थोर शास्त्रज्ञ माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंती कार्यक्रम प्रसंगी ससाणे बोलत होते. ससाणे पुढे म्हणाले की भारतीय क्षेपणास्त्र विकासात डॉ. अब्दुल कलाम त्यांचे मोलाचे योगदान होते. क्षेपणास्त्र विकास कार्यामधील अग्नि क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. अब्दुल कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. त्यामुळे त्यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखत. विज्ञानाचा परमभोक्ता व देशात लोकप्रिय असणारे डॉ. अब्दुल कलाम मनाने अतिशय संवेदनशील व साधे होते. भारत सरकारने भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. अथक परिश्रम, विद्येची अखंड साधना करीत खडतर जीवन जगलेले आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतीपदी निवड झालेले डॉ. अब्दुल कलाम हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व होते. यावेळी डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, शहर काँग्रेसचे अध्यक्ष अण्णासाहेब डावखर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत ओगले, मा.नगरसेवक दिलीप नागरे,ॲड. भागचंद चुडिवाल,डॉ. राजेंद्र लोंढे, रावसाहेब आल्हाट, ॲड. सुहास चुडीवाल,सुनील साबळे, रितेश एडके, नवाज भाई जहागीरदार, सुरेश ठुबे, रितेश चव्हाणके, सनी मंडलिक, बुऱ्हानभाई जमादार, बाबा वायदंडे, सुरेश बनसोडे, नजीर शेख, शाहेबाज पटेल, योगेश गायकवाड,राजेश जोंधळे, गोपाल भोसले, श्रेयस रोटे,  तीर्थराज नवले, कल्पेश पाटणी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 *संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
close