shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

पाच हजार रुपये रोख लाच घेतल्याबद्दल तीन पोलिसांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ने केला गुन्हा दाखल..!

दारूची बाटली व पाच हजार रुपये रोख लाच घेतल्याबद्दल तीन पोलिसांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ने केला गुन्हा दाखल..!

सापळा अहवाल
▶️ युनिट -अहिल्यानगर.
▶️ तक्रारदार- पुरुष,वय- 40 वर्षे
▶️ आलोसे – 1) रघुवीर ओंकार कारखिले, पोलीस नाईक, बक्कल नंबर 232, वर्ग-3,
2) राहुल महादेव नरवडे, पोलीस कॉन्स्टेबल, बक्कल नंबर 651, वर्ग-3,
3) गौतम शंकर लगड, पोलीस कॉन्स्टेबल, बक्कल नंबर 717, वर्ग-3, सर्व नेमणूक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, जिल्हा अहिल्यानगर

▶️ लाचेची मागणी
6000/- रुपये तडजोडीअंती 5,000/- रुपये व 2600/- रुपये किंमतीची हंड्रेड पाईपर कंपनीची दारूची बाटली दिनांक -06/09/2024
▶️ लाच स्विकारली
▶️ हस्तगत रककम-

▶️ लाचेचे कारण
तक्रारदार यांचा श्रीरामपूर येथे मटक्याचा व्यवसाय असून तक्रारदार यांचे मटक्याचे व्यवसायावर कारवाई न करता मटक्याचा व्यवसाय चालू ठेवण्याकरता पोलीस नाईक रघुवीर ओंकार कारखिले यांनी तक्रारदार यांच्याकडे 6000/- रुपये लाचेची मागणी केल्याबाबतची तक्रार दि.06/09/2024 रोजी ला.प्र.वि. अहिल्यानगर येथे प्राप्त झाली होती. सदर लाच मागणी तक्रारीच्या अनुषंगाने दि.06/09/2024 रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली. लाच मागणी पडताळणी दरम्यान पोलीस नाईक रघुवीर ओंकार कारखिले यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांच्या मटक्याच्या व्यवसायावर कारवाई न करता व्यवसाय चालू ठेवण्यासाठी 6000/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 5000/- रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर आरोपी लोकसेवक कारखिले यांनी तक्रारदार नको म्हणत असताना त्यांना त्यांच्या मटक्याच्या व्यवसायाच्या ठिकाणी घेऊन जाऊन त्या ठिकाणावरून तक्रारदार यांच्याकडून 4000/- रुपये त्यामध्ये पाचशे रुपये दराच्या आठ भारतीय चलनी नोटा अशी रक्कम स्वीकारली व उर्वरित 1000/- रुपये व दारूच्या खंब्याची मागणी केली व पोलीस कॉन्स्टेबल राहुल महादेव नरवडे यांनी तक्रारदार यांच्या मटक्याचे व्यवसायावर कारवाई न करता त्यांचा मटक्याचा व्यवसाय चालू ठेवण्यासाठी 2600/- रुपये किंमतीची हंड्रेड पाईपर कंपनीची दारूच्या बाटलीची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली व पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे यांनी मागणी केलेली दारूची बाटली आणण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल गौतम शंकर लगड यांनी तक्रारदार यांना प्रोत्साहन दिले. सदर बाबत तिन्ही आरोपी लोकसेवक यांचेविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
▶️ सापळा व तपास अधिकारी
श्री.राजू आल्हाट,
पोलिस निरीक्षक,
▶️ सापळा पर्यवेक्षण अधिकारी
श्री. अजित त्रिपुटे, पोलीस उप अधीक्षक
▶️ सापळा पथक
पोलीस अंमलदार किशोर लाड, सचिन सुद्रुक, चालक पोहेकॉ. हारुण शेख, चापोहेकॉ. दशरथ लाड

close