प्रतिनिधी : दुर्गेश राठोड
अक्कलकोट : 3 / सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथील नवरात्र निमित्त अर्थात घटस्थापनेच्या दिवशी राठोड कुटुंबीयांची 25 वर्षाची परंपरा आहे. अल्प दरात खाद्य तेल वाटून आजच्या युगात सामाजिक सेवेचा तसेच अल्प दरात तेल वाटप करून एक प्रकारे नावलौकिक मिळविले आहे.
घटस्थापनेच्या दिवशी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी जे. डी.गोल्ड चे मालक जयप्रकाश राठोड पत्नी सौ.पुष्पा राठोड यांच्या हस्ते खाद्य तेल वाटप कऱण्यात आले.अक्कलकोट येथील मध्यवर्ती ठिकाणी सुमारे 24 हजार लिटर खाद्य तेल केवळ ना नफा ना तोटा या तत्त्वावर अल्प दरात संपूर्ण तालुक्यात वाटप करून संपूर्ण जिल्ह्यात एक प्रकारे आपले नावलौकिक मिळवले आहे .
अक्कलकोट येथील जे.डी.राठोड ऑइल मर्चंट,कारंजा चौक येथील दुकानाचे मालक विकास राठोड व लखन राठोड यांनी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी खास घटस्थापनेच्या दिवशी फक्त अल्प दरात तेलाचे भाव वाढले असताना पण विकास राठोड व लखन राठोड यांनी सर्वसामान्य व गरीब वर्गाची एक प्रकारे चांगली व उत्तम सेवा केली असल्याची सर्वसामान्य ग्राहकांमधून बोलले जात आहे.
अक्कलकोट शहरात ज्याप्रमाणे राठोड कुटुंबीयांनी अल्पदरात तेल वाटपाचा एक आगळावेगळा कार्यक्रम केला आहे त्याच पद्धतीने त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी अशाच पद्धतीने नवरात्राच्या मुहूर्तावर तेल वाटपाचा कार्यक्रम करावा अशी मागणी सर्वसामान्य तेल ग्राहकांमधून होत आहे.
हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी राठोड परिवारातील दुर्गेश राठोड, सनी राठोड,वेदांत राठोड,तसेच सिद्धू मुळजे,लखमीपुत्र कुंभार, प्रशांत राऊत,बजंत्री,स्वामी,रिहान मकानदार कल्लपा जगताप,अशोक,बाळू व्हटकर,बाळू शिंदे,आदि जणांनी तेल वाटपासाठी सहकार्य केले.