shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने एरंडोलमध्ये श्री दुर्गा माता दौडचे आयोजन.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने एरंडोलमध्ये दुर्गा माता दौडचे आयोजन.


एरंडोल:- 'दुर्गा माता दौड' या शब्दातच या शब्दाची ताकत आणि अर्थ सामावलेला आहे.पुथ्वीतलावर जेव्हा जेव्हा संकट आले, जेव्हा जेव्हा अधर्माचा उन्माद वाढला तेव्हा तेव्हा आई जगदंबा दुर्गेचा अवतार घेते. याच दुर्गेच्या नावाने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान (Shivpratisthan Hindustan) च्या वतीने दुर्गा माता दौडचे आयोजन करण्यात येते. 

     दुर्गा माता दौड म्हणजे देव,देश,धर्माच्या रक्षितेच प्रतिक,छत्रपती शिवरायांचा अपार पराक्रमाची गाथा.दुर्गा माता दौड चे वैशिष्ट्य म्हणजे अग्रभागी मानाचा भगवा ध्वज.. त्यामागे सहभागी झालेले युवक व लहान युवती एरंडोल शहरातील वेगवेगळ्या भागातून दौड जात असते. प्रत्येक ठिकाणी श्री दुर्गामाता दौड चे उत्साहात स्वागत करून पुजन करून औक्षण केले जात आहे. छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने परिसर दणाणून जात आहे.

        दरम्यान पाश्चात्य संस्कृतीचे अतिक्रमण हटवून भारतीय संस्कृती जपण्यासाठी व ती पुन्हा रुजवण्यासाठी तसेच प्रत्येकाच्या मनामध्ये देशभक्तीची ज्योत तेवत ठेवण्यासाठी ह्या दौड चे आयोजन करण्यात येते. घटस्थापना पासून श्री दुर्गा माता दौड ची सुरवात होऊन सांगता दसऱ्याला होते. एरंडोल शहरातील प्रत्येक भागातून दुर्गा माता दौड जात असते.


close