shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा*

*विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा* 
इंदापूर : भारताचे राष्ट्रपती स्वर्गीय डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा  १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून महाविद्यालयात साजरा करण्यात आला .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्राध्यापक सुनील शिंदे यांनी केले तसेच त्यांनी डॉ.अब्दुल कलाम यांच्या कार्याचा थोडक्यात परिचय करून दिला.पुस्तकरुपी वाचन हे आपल्या शिक्षण व्यवस्थेतील अभ्यासाचे प्रमुख माध्यम आहे, त्याचबरोबर ते माणसाच्या ज्ञान व माहितीचेही अत्यंत प्रभावशाली साधन आहे असे प्रतिपादन यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांनी केले. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांकरिता उत्कृष्ट वाचक पुरस्कार देण्याची घोषणा केली. जो विद्यार्थी ग्रंथालयातील पुस्तकांचा वाचनासाठी व अभ्यासाकरिता जास्तीत जास्त वापर करेल त्या विद्यार्थ्यांना हा पुरस्कार दिला जाईल अशी घोषणा या कार्यक्रमाच्या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुजय देशपांडे यांनी केली  या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे ग्रंथपाल अतुल चंदनवंदन यांनी केले. तसेच या कार्यक्रमास प्राध्यापक दिनेश सावंत, प्राध्यापक राजू वाघमारे , प्रफुल्ल राजे भोसले, गवळी सागर जाधव, मोहिते, नवले यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमास सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुजय देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी पार पडला. या कार्यक्रमास विद्या प्रतिष्ठान संस्थेचे सचिव, रजिस्ट्रार यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
close