पैठण / प्रतिनिधी:
मुंबईच्या दादर-माटुंगा येथील वंदना प्रकाशनाच्यावतीने २०२४ चा उत्कृष्ट वाङमय निर्मितीच्या पुरस्कारासाठी यंदा मराठवाडयाचे प्रसिध्द बाल साहित्यिक श्री. अय्युब पठाण लोहगांवकर यांच्या बालकांसाठी सुसंस्कारीत व आशयघन तथा दर्जेदार असलेला " ज्ञानपोई " या संग्रहाची राज्यस्तरीय रौप्य महोत्सवी निमित्ताने राज्यस्तरीय आशिर्वाद बालसाहित्य पुरस्कार हा जाहीर झाला आहे. असे वंदना प्रकाशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व संयोजक डॉ. सुनील सावंत यांनी कवी अय्युब पठाण यांना पत्राद्वारे नुकतेच कळविले आहे.
या पुरस्कारासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून २४० पुस्तके आलेली होती. त्यातून पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्रा. स्मेश कोटस्थाने व समितीमधील चौदा सदस्यांनी उत्कृष्ठ वाङमय निर्मितीच्या पुरस्कारासाठी आशिर्वाद बालसाहित्य पुरस्काराचे मानकरी " ज्ञानपोई "चे कवी अय्युब पठाण लोहगावकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. मुंबई येथे होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. भालचंद्र मुणगेकर व प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रविंद्र शोभणे यांच्या शुभ हस्ते दि. ३० नोव्हेंबर २०२४ रोजी कवी अय्युब पठाण यांना राज्यस्तरीय आशिर्वाद बाल साहित्य पुरस्काराने सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११