shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

श्रीमती विमलताई यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमाची साई चरित्र पूजन करून कार्यक्रमात सुरुवात


शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
 सामाजिक बातमी

श्री साईबाबांचे समकालीन साई भक्त लक्ष्मण मामा व त्यांचे पुत्र बाप्पाजी काका यांच्या घरातील भीमाशंकर बाप्पाजी रत्नपारखी यांच्या पत्नी श्रीमती विमलताई यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन हॉटेल साई गोल्ड शिरडी येथे करण्यात आले होते. यावेळी श्री साईचरित पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. याप्रसंगी सुप्रसिद्ध नारदिय कीर्तनकार प्रवचनकार ह भ प श्री प्रभंजन भगत महाराज यांना निमंत्रित करण्यात आले होते. आपल्या प्रवचनात त्यांनी स्तवन मंजिरी तसेच साई चरित्र यातील काही दाखले दिले. आई व साई यांच्यातील साम्य अशा विषयावर प्रबोधन केले. निरूपणासाठी साई स्तवन मंजीरी यातील तू गाय मी वासरू तू माय मी लेकरू ही ओवी घेत निरूपण केले. श्री साईबाबांनी आपल्याच भक्तांना भक्तीचा वसा कसा दिला व त्यातूनही काय लीला घडवली याची समर्पक दाखले दिले. लक्ष्मण मामा व त्यांच्या परिवाराला बाबांनी काय सेवा दिली अन्  बाबा कशी स्वीकारत आहेत या बद्दल विवेचन केले. सामाजिक कार्यात असणारे विनायक रत्नपारखी यांच्या मातोश्री  कै.श्री विमलताई ह्या बाबांची सेवा कशी करावी याचे उत्तम उदा. आहेत. तो सध्याचा एक उत्तम आदर्श असेल. बाबांची उदी (अंगारा) यावर त्यांची नितांत श्रद्धा होती. त्यांची पांडुरंगाची सेवा बघून बाप्पाजी काकांना नेहमीच त्यांचा अभिमान वाटायचा.

विठ्ठल भक्तीचा वारसा असणारे लक्ष्मणमामा साई भक्ती हे एकच तत्व आहे असे मानत असत. काकड आरती तू कर व मी हा देह सोडला आहे. परंतु मी इथेच आहे याची खात्री बाबांनी या लीलेतून करून दिली. त्याचा अनुभव आज प्रत्येकास नक्कीच येत आहे. साई विठ्ठल भक्तीचा वारसा रत्नपारखी कुटुंबात आजही चालूच आहे.
प्रवचन झाल्यावर भोजन प्रसादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सूत्रसंचालन वैभव शास्त्री यांनी केले. तर महाराजांचा सत्कार रत्नपारखी कुटुंबीयांनी केला यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमास भाजप नेते राजेंद्र भाऊ गोंदकर प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते माजी उपनगराध्यक्ष विजयराव जगताप शिवसेना नेते कमलाकर कोते सचिन कोते तुकाराम गोंदकर दादासाहेब गोंदकर, रमेश शेळके, दिपक वारुळे, धनंजय पाटील संदेश खोत बा रा जोशी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close