shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

नवरात्र उत्सवानिमित्त माताशक्ती विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


नवरात्र उत्सवानिमित्त माताशक्ती विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

पिंपळे खुर्द येथे 'चालता बोलता'चा              कार्यक्रम अंधश्रद्धा निर्मूलन,ग्रामस्वच्छता, हागणदारीमुक्तीबाबत जनजागृती...

पिंपळे खुर्द (ता. अमळनेर) येथे नवरात्र उत्सवा निमित्त महिला,युवती व शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी, या पार्श्वभूमीवर पिंपळे येथील प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच वर्षा युवराज पाटील व शिवशाही फाउंडेशन, उमेश काटे सर,तालुका गणित मंडळाचे डी ए धनगर सर ,विज्ञान मंडळाचे पेंढारे सर, जगदीश पाटील सर ,यांच्या तर्फे 'चालता बोलता' हा कार्यक्रम घेण्यात आला. विजेत्यांना भेटवस्तू देण्यात आल्या.

नवरात्र उत्सवानिमित्त माताशक्ती विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

ग्रामीण भागातील महिलांमध्ये अंधश्रद्धेचे निर्मूलन व्हावे, हागणदारी मुक्त, ग्रामस्वच्छता यासह दारू बंदी, हुंडाबळी, स्त्रीभृण हत्या आदींबाबत

जनजागृती व्हावी, यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला. उमेश काटे व यांनी महिला, युवती व शालेय विद्यार्थ्यांना प्रश्न विचारली. तीन प्रश्नांची उत्तरे देणाऱ्या उज्ज्वला पाटील, संगीता पाटील, विमलबाई पाटील, पूजा चौधरी, तृष्णा पाटील यांच्यासह उमेश पाटील, जगृती पाटील, वेदांत पाटील, शिला पाटील यांना भेटवस्तू देण्यात आल्या. पिंपळे खुर्दचे प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सौ वर्षा युवराज पाटील, माजी सरपंच भाऊसाहेब आप्पा पाटील व सदस्य संतोष बापू चौधरी आदी प्रमुख पाहुणे होते. ज्ञानेश्वर पाटील, जयंत पाटील, समाजिक कायकर्त युवराज पाटील, नारायण दामू पाटील,हिम्मत रामभाऊ पाटील,पुरुषोत्तम चौधरी, अविनाश नाटू पाटील,भैय्या सुखदेव पाटील आदींनी सहकार्य केले.

close