अजीजभाई शेख / राहाता:
श्रीरामपूर येथील सामाजिक कार्यकर्ते मुश्ताकभाई शेख आणी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या फरजाना शेख यांची मोहसीन ए मिल्लत कमेटीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यानिमित्ताने श्रीरामपूर येथील समता कार्यालयात सामाजिक कार्यकर्ते शौकतभाई शेख यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मोहसिन ए मिल्लत कमेटीचे अध्यक्ष ॲड. मोहसीन शौकत शेख, पदाधिकारी सर्वश्री सरताज शेख, समदानी गुलाम रब्बानी, शब्बीर (राजु कुरेशी), नदीमताज गुलाम, अमीर मेमन आदि मान्यवर उपस्थित होते.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शौकतभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. मोहसिन शेख संचलित मोहसिन ए मिल्लत कमेटी सामाजिक कार्यात अग्रेसर असून कमेटीद्वारे सामाजातील उपेक्षित आणी दुर्लक्षीतांसोबत जनसामान्यांचे मुलभूत प्रश्न आणी सेवेसाठी सातत्याने विविध सामाजाभिमुख उपक्रम राबविले जातात. मुश्ताकभाई शेख आणी फरजाना शेख यांचे कमेटीत उत्कृष्ट कामे पाहता त्यांना कमेटीच्या उपाध्यक्षपदाची ही जबाबदारी सोपविण्यात आली असल्याचे यावेळी ॲड. मोहसिन शेख म्हणाले.
या निवडीबद्दल कमेटीचे वरिष्ठ मार्गदर्शक व कार्याध्यक्ष हाजी इलाहीबक्ष कुरैशी, तसेच हाजी फ़याज़ बागवान, ॲड. हारून बागवान, ॲड. मुमताज बागवान, अफ़ज़ल मेमन, आरिफ कुरैशी, यूनुस कुरैशी, इब्राहिम बागवान, जाकिर शाह, जावेद शेख, कलीम शेख (रॉयल रिश्ता), मोहम्मदशफी अंसारी, शब्बीर शेख आदींनी अभिनंदन केले आहे.
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११