shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

तीन लाख मतदार ठरविणार राहुरीचा आमदार, निवडणूक प्रशासनाची पत्रकार परिषदेत माहिती ; राहुरी मतदारसंघात ३०८ मतदान केंद्रे..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे 
गुरूवार १७  ऑक्टोंबर २०२४

राहुरी : आचारसंहिता लागू झाल्यानंतर राहुरी निवडणूक प्रशासनाने पत्रकार परिषद घेत विधानसभेचे नियोजन तसेच नवीन मतदार नोंदणीची माहिती दिली. २० नोव्हेंबर रोजी विधानसभेचा लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी १ लाख ६६ हजार ७६२ पुरूष तर १ लाख ५४ हजार ३२५ तर इतर १ असे एकूण ३ लाख २१ हजार ८८ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे. मतदार यादीमध्ये मागील विधानसभेपेक्षा बंदा ३३ हजार अधिक नवीन मतदार नोंदणी झाल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा राहुरी निवडणूक निर्णयाधिकारी २२३ राहुरी विधानसभा मतदार संघाचे शाहुराज भोरे यांनी दिली.

        राज्यात विधानसभेचा बिगूल बाजल्यानंतर राहुरी विधानसभा मतदारसंघातील पेटलेल्या राजकीय वणव्यात अनेक इच्छुकांनी मुंबई येथील मंत्रालय गाठण्याच्या उद्देशाने यंत्रणा उभारणी सुरू केली आहे. आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर राहुरी विधानसभेची सविस्तर माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत मोरे, तहसीलदार नामदेव पाटील, नायब तहसीलदार संध्या दळवी यांनी विधानसभा आचारसंहिता व मतदार संघातील नियोजनाची माहिती दिली. उपजिल्हाधिकारी मोरे यांनी सांगितले की, २०१९ च्या निवडणुकीवेळी पुरुष मतदार १ लाख ५७ हजार ७०९ इतके होते तर महिला मतदार १ लाख ३६ हजार ४९६ इतक्या होत्या. त्यामध्ये वाढ होऊन यंदाच्या विधानसभेला मतदारयादीनुसार ३३ हजार नवमतदार बाढले आहे. राहुरी मतदारसंघामध्ये मागील निवडणुकीच्यावळी एकही संवेदनशील मतदान केंद्र नसले तरीही चोख बंदोबस्त तसेच उचित नियोजन व्यवस्था राखली जाणार आहे. राहुरी, नगर, पाथर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण ३०७ मतदान केंद्र आहे. तर बुऱ्हाणनगर येथील एका मतदान केंद्रामध्ये १ हजार ५०० पेक्षा अधिक मतदार असल्याने तेथे उपमतदान केंद्र अधिक असणार आहे. राहुरी येथील जुने सेतू कार्यालयामध्ये अर्ज विक्री, स्वीकृती प्रक्रिया केली जाणार आहे.

तीन लाख मतदार ठरविणार राहुरीचा आमदार, निवडणूक प्रशासनाची पत्रकार परिषदेत माहिती ;
राहुरी मतदारसंघात ३०८ मतदान केंद्रे..!!

     निवडणूक प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या एकूण १ हजार ७१० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये नियोजन करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्राबर ५ कर्मचारी असे १ हजार ५४० कर्मचारी कार्यरत तर राखीव कर्मचारी १७० राहणार आहे. मतदान केंद्रासाठी नेमणूक असलेल्या कर्मचाऱ्यांना आपले रपाली मतदान करण्यासाठी प्रशिक्षण ठिकाणावरच मतदान सुलभता केंद्र देण्यात येणार आहे. कर्मचाऱ्याऱ्यांना संबंधित ठिकाणी आपले गुप्त मतदान देता येणार आहे. ज्या मतदान केंद्रावर लोकसभा निवडणुकीत मतदान केंद्र कमी झाले आहे तेथे मतदानाचा आकडा वाढविण्यासाठी मतदान केंद्राची सजावट तसेच इतर उपक्रम प्रशासनातर्फे राबविले जाणार आहे.

Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close