एरंडोल :- शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी पळासदळ, एरंडोल येथे दिनांक ३ ऑक्टोबर २०२५ रोजी फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाचा मुख्य उद्देश शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा घडवून आणण्यासाठी प्राध्यापकांच्या कौशल्यांचा विकास करणे हा होता. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व प्राचार्य डॉ. विजय शास्त्री यांनी प्राध्यापकांना मार्गदर्शन करत या उपक्रमाच्या महत्त्वावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून श्रम साधना ट्रस्ट मुंबई संचालित इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. अमोल लांडगे आणि गव्हर्मेंट फार्मसी जळगावच्या विभाग प्रमुख डॉ. चैताली पवार लांडगे यांना आमंत्रित करण्यात आले होते. डॉ. अमोल लांडगे यांनी महाविद्यालयात गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्राध्यापकांच्या कौशल्यवृद्धीचे महत्त्व सांगितले, तर डॉ. चैताली पवार लांडगे यांनी "प्रभावी शिक्षक होण्यासाठी साधनांचा योग्य वापर" या विषयावर मार्गदर्शन केले.
या उपक्रमात प्राध्यापकांना नवीन तंत्रज्ञान व शिक्षण पद्धतींबद्दल माहिती मिळाली, ज्यामुळे ते विद्यार्थ्यांना अधिक प्रभावीपणे शिकवू शकतील. कार्यक्रमाचे संचालन प्रा. श्रद्धा शिवदे यांनी केले आणि प्रा. जावेद शेख यांनी उपस्थितांचे आभार मानले.