मनसे पदाधिकाऱ्यांकडून फटाक्यांची आतिषबाजी करत केला जल्लोष
श्रीरामपुर विधानसभेतून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राज्य सचिव राजाभाऊ कापसे यांची श्रीरामपुर विधानसभा मतदारसंघासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेने कडून उमेदवारी जाहीर झाली असून श्रीरामपुर येथील जिल्हा संपर्क कार्यालयासमोर मनसे पदाधिकाऱ्यांकडून फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष करण्यात आला. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, मनसे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र चव्हाण,विधानसभा अध्यक्ष डॉक्टर संजय नवथर, मनसे तालुकाध्यक्ष अमोल साबणे, मनसे शहराध्यक्ष सतीश कुदळे, माथाडी कामगार सेना तालुकाध्यक्ष भास्कर सरोदे,कामगार सेना तालुकाध्यक्ष विलास पाटणी, रोजगार सेना तालुका अध्यक्ष नितीन जाधव, आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी सांगितले की, समाजसेवेची आवड व विकासाचा पाया रचणाऱ्या राजाभाऊ कापसे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर संपूर्ण श्रीरामपुर विधानसभा क्षेत्रामध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. श्रीरामपुर विधानसभा मतदारसंघांमध्ये मनसेला चांगला प्रतिसाद लाभत असून श्रीरामपुर मध्ये परिवर्तन होण्याची वाट लोक पाहत आहेत. निवडणूक म्हटली की, आव्हाने येणारच परंतु आमच्या पाठी राजसाहेब ठाकरे असल्याने आम्हाला कुठल्याही प्रतिस्पर्ध्यकाचे आव्हान कठीण नाही विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहोत. श्रीरामपुर विधानसभा मतदारसंघात नवनिर्माण करणे हाच आमचा प्रमुख ध्येय आहे. मतदारसंघाचा विकास, स्थानिक युवकांना रोजगार, उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी मनसे नेहमीच कटिबद्ध राहील, त्याचबरोबर येथील जनतेने राजाभाऊ कापसे यांना भरघोस मताने विजयी करून दिल्यास श्रीरामपुर विधानसभा क्षेत्राचा नवनिर्माण करण्याचे आश्वासन यावेळी दिले. मनसेचे उमेदवार राजाभाऊ कापसे यांचे नाव नागरिकांच्या मनात व घराघरात पोहोचले आहे. त्यांनी स्वनिधितून केलेली विकास कामे, गोरगरीब, गरजू यांना केलेली मदत पाहता चांगल्या मताधिक्याने ते निवडून येतील अशी आशा आहे त्यांनी व्यक्त केली. आजपासूनच आम्ही घराघरात गावागावात मनसेचा प्रचार करण्याचे काम करणार आहोत. तसेच मनसेचे उमेदवार राजाभाऊ कापसे हे असंख्य मनसे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्य सचिव राजाभाऊ कापसे यांचा राज साहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मनसे पक्षांमध्ये जाहीर प्रवेश करून घेण्यात आला या प्रसंगी राजसाहेब ठाकरे यांनी श्रीरामपूर विधानसभेतून राजाभाऊ कापसे यांची उमेदवारी जाहीर करून एबी फॉर्म दिले व राज साहेब ठाकरे म्हणाले की तुमच्यासाठी श्रीरामपूर मध्ये मी लवकरच जाहीर सभा घेणार असल्याची माहिती देण्यात आली याप्रसंगी मनसे नेते अविनाश अभ्यंकर, मनसे नेते नितीन सरदेसाई, मनसे सरचिटणीस राजा चौगुले, मनसे राज्य उपाध्यक्ष व नगर जिल्हा निरीक्षक सतीश नारकर, मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये राजाभाऊ कापसे व पंचायत समिती माजी सदस्य विकी कापसे यांचा मनसे पक्षांमध्ये जाहीर प्रवेश झाला याप्रसंगी मनसे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र चव्हाण,विधानसभा अध्यक्ष डॉक्टर संजय नवथर, मनसे तालुकाध्यक्ष अमोल साबणे, मनसे शहराध्यक्ष सतीश कुदळे, माथाडी कामगार सेना तालुकाध्यक्ष भास्कर सरोदे,कामगार सेना तालुकाध्यक्ष विलास पाटणी, रोजगार सेना तालुका अध्यक्ष नितीन जाधव, आधी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.