shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

श्री अविनाश पाटील यांच्या 'यशोगाथा थोरांची - थोर महिलांची यशोगाथा' या पुस्तकाचे सोलापूर येथे राष्ट्रीय काॅन्फरन्स मध्ये प्रकाशन ...

श्री अविनाश पाटील यांच्या 'यशोगाथा थोरांची - थोर महिलांची यशोगाथा' या पुस्तकाचे सोलापूर येथे राष्ट्रीय काॅन्फरन्स मध्ये प्रकाशन ...


धुळे दि. १० नुकतीच सर फाउंडेशन आयोजित 'नॅशनल एज्युकेशन इनोव्हेशन कॉन्फरन्स' सोलापूर येथे संपन्न झाली. या परिषदेमध्ये राज्यातील तसेच राज्याबाहेरील शिक्षणतज्ञ उपस्थित झालेले होते. यावेळी धुळे येथील बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक श्री अविनाश पाटील यांच्या यशोगाथा थोरांची या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे या पुस्तकात थोर महिलांची यशोगाथे सोबतच त्यांचा जीवन परिचय देणारा शैक्षणिक व्हिडिओ व ऑनलाईन टेस्ट यांचा क्यू आर कोड पण दिलेला आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त माहिती देणारे हे पुस्तक असल्याचे जाणकारांनी सांगीतले. 

अशा या पुस्तकाचे श्री अविनाश पाटील यांनी संकलन व लेखन केलेले आहे. 'यशोगाथा थोरांची - थोर महिलांची यशोगाथा' या पुस्तकाचे सोलापूर येथे सारथीचे एम. डी. मा. श्री अशोक काकडे साहेब, मा. डॉ. आशिष भट्टाचार्य शास्त्रज्ञ, मा. अभयजी दिवाण - संपादक सकाळ समूह, मा. संजय जगताप संपादक 'जीवन शिक्षण' मा. श्री योगेश सोनवणे, आय. टी. विभागप्रमूख, पुणे, मा. डॉ. शशिकांत शिंदे, उपक्रमशील व ख्यातनाम शिक्षक मा. श्री भाऊसाहेब चासकर, डाएट प्राचार्य मा. डॉ इब्राहिम नदाफ, मा. श्री कादर शेख, मा. श्री सिद्धाराम माशाळे, मा. श्री बाळासाहेब वाघ, मा. सौ. हेमा शिंदे, मा. श्री राजकिरण चव्हाण यांच्या उपस्थितीत पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न.

close