शेतकरी, शेतमजूर, महिला भगिनी, व्यापारी, उद्योजक व्यावसायिक या सर्वांना जास्तीत जास्त कशी सवलत मिळेल हा प्रयत्न सरकार करते - आमदार दत्तात्रय भरणे.
निमगाव केतकी येथील शेतकऱ्यांनी शून्य विज बिल आल्याबद्दल सरकारसह आमदार दत्तात्रय भरणे यांचे मानले आभार.
इंदापूर: सरकार आमच्या शेतकरी, शेतमजूर, महिला भगिनी, व्यापारी, उद्योजक व्यावसायिक या सर्वांना जास्तीत जास्त कशी सवलत मिळेल हा प्रयत्न हा राज्य सरकार करीत आहे असे प्रतिपादन निमगाव केतकी येथे महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री व इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजने अंतर्गत चालू वीज देयकाची शून्य शून्य ग्राहकांनी भरावयाची रक्कम असलेली पावती शेतकऱ्यांना देण्यात आली त्यावेळी बोलताना आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले.
महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक संकीर्ण २०२४/प्र क्र ९७/ऊर्जा ५ दिनांक २५ जुलै२०२४ च्या तरतुदीनुसार मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने माहे एप्रिल ते जून २०२४ या कालावधीच्या चालू वीज बिलाच्या पहिल्या हप्त्याचा भरणा केला आहे शासन निर्णयाप्रमाणे यापुढील बिलामध्ये बळीराजा मोफत वीज योजनेची रक्कम अशी जमा होत राहील अशा आशियाचे विशेष संदेश या दिला वरती देण्यात आलेले आहे. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेमार्फत शून्य शून्य बिल आल्याने निमगाव केतकी येथील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांचे आभार मानले तसेच या शेतकऱ्यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांना पेढे भरून आनंद उत्सव साजरा केला.
तसेच आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले की,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांना आज सर्वांनी निश्चित प्रकारे धन्यवाद दिले पाहिजे. एक मोठा ऐतिहासिक निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून या सर्वांनी घेतलेला आहे. शेतकऱ्यांची मागणी होती की वीज माफी केली पाहिजे .पाच हाऊस पॉवर ते साडेसात हाऊस पॉवर या विद्युत पंपाचे विजेचे जोडणी शेतकऱ्यांकडे असते. या वीज जोडणी चा उपयोग शेतकऱ्यांना त्यांचे पिकाला पाणी देण्यासाठी होत असतो. पाऊस कधी कमी पडतो कधी जास्त पडतो. त्यामुळे उत्पन्नामध्ये शेतकरी अडचणीत येतो. अशा अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांना कुठेतरी मदत केली पाहिजे. या हेतूनही राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय या शेतकऱ्याची वीज माफी करण्याचा त्याच्या असणाऱ्या विद्युत पंपाचा घेतलेला आहे. आज या शेतकऱ्यांच्या हातात जी बिले आहेत. ही सगळी बिल साधारणतः शून्य शून्य आलेले आपण पाहिले आहेत. सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की, शेतीचे पीक कर्ज आहे. तीन लाखापर्यंत शून्य टक्क्याने देण्याचा निर्णय राज्य सरकार घेत आहे. केंद्र सरकार घेत आहे. निश्चित प्रकारे ह्या सर्व घटकांचं केंद्र सरकारच्या राज्य सरकारचा पुढे आज या शेतकऱ्यांनी आभार मानन थोडेच आहेत. अजूनही शेतकऱ्यांसाठी काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी सरकार अजूनही कटिबद्ध आहे .आज आपण या निमगाव मध्ये सगळे शेतकरी हजर आहेत. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती एक आनंद आहे. राहता राहिला शेतकऱ्यांचा दुसरा विषय शेतीच्या पाण्याचा याबाबतीमध्ये सुद्धा एक चांगला निर्णय सरकार घेण्याची त्यांची शक्यता आहे. भविष्यामध्ये शेतीच्या पाण्याच्या बाबतीमध्ये जो आपल्याला इतर उन्हाळ्यामध्ये जी अडचण येते ती अडचण सुद्धा भविष्यात त्याबाबतचे निर्णय होणार आहेत. त्याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना होणार आहे. आज आपणास माहित आहे की सरकारची लाडकी बहिणी योजना, लाडकी लेक योजना, तीन मोफत गॅस सिलेंडर असे अनेक योजना. मुलींचे मोफत शिक्षण योजना, वयो श्री योजना त्यांना सरकार मानधन देणार आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ग्राम रोजगार सेवक त्यांना ही सरकारने प्रवाह मध्ये घेतलेला आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस, आशाताई यांच्यासह सरकारने खूप चांगले निर्णय घेतलेले आहेत .त्यामुळे निश्चित या महिला बहिणींना याचा फायदा होणार आहे. सरकार आमच्या शेतकरी, शेतमजूर, महिला भगिनी, व्यापारी, उद्योजक व्यावसायिक या सर्वांना जास्तीत जास्त कशी सवलत मिळेल हा प्रयत्न हा राज्य सरकार करीत आहे.