सर्जा-राजाचा सण म्हणजे बैलपोळा.
इंदापूर: भारतीय संस्कृतीमध्ये सण-उत्सवांना खूप महत्व आहे. महाराष्ट्रात अनेक सण साजरे होतात पण बैलपोळा या सणाला विशेष महत्त्व आहे.पूर्वीच्या काळी घरोघरी बैल असायचे. पहाटेच बैलांना स्नान घातले जायचे.बैलांना सजवण्यासाठी त्यांच्या अंगावर झुल टाकत,शिंगाना हिंगुळ लावून त्यावर कागदी बेगिडे चिकटवत व गोंडे,फुगे बांधत.अंगावर रंग लावून गळ्यात घंटा बांधत असत.सर्व जनावरांची दावी बदलत असत.बैलांची पूजा करून त्यांना पुरणपोळी चा नैवैध दाखवत त्यांची ढोल,गुलाल,फटाक्यांची आतिषबाजी करत मिरवणूक काढत.बैलपोळा सणादिवशी बैलांना दिवसभर कामासाठी जुंपत नसत.
हल्ली ग्रामीण भागात झपाट्याने होणारे शहरीकरण, घटणाऱ्या शेती क्षेत्राबरोबरच पशुधनाची घटती संख्या आणि यांत्रिकीकरणामुळे बैलांची संख्या कमी होऊ लागली आहे.अनेक घरी बैलजोडी नाही त्यामुळे बैलांविना पोळा साजरा करावा लागत आहे.सण उत्सव या आपल्या परंपरा आहेत त्या टिकणे गरजेचे आहे.सण उत्सव साजरे होण्यासाठी प्रोत्साहन देऊन जनजागृती करणे गरजेचे आहे.
भारत ननवरे सर
मुख्याध्यापक जि.प.प्राथ.शाळा कौठळी.
ता.इंदापूर, जि.पुणे.