shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

जयवंतराव जगतापांच्या निर्णयाची वाट मतदार पहातोय . . .

 प्रतिनिधी :सचिन जव्हेरी

 करमाळा : विधानसभेला उमेदवार कोण असतील, कोणा-कोणात  खरी लढत होईल, कोण आमदार होईल, यापेक्षा माजी आमदार तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयवंतराव जगताप कोणता निर्णय घेतील, याचीच संपुर्ण राजकीय पटलच काय, करमाळा तालुका वाट पहातोय. जयवंतरावांचा निर्णय करमाळा विधानसभेचा आमदार ठरवणार असल्याने सर्वच इच्छुक उमेदवार जयवंतरावांचे दार,आमदार होण्यासाठी खटखटवत आहेत म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 

गेल्या विधानसभा निवडणुकीत बागल व माजी आमदार नारायण पाटील यांचेशी आपल्याला झालेल्या मानसिक त्रासाचा वचपा काढण्यासाठी संजयमामा शिंदे यांना खंबीर व यशस्वी साथ देवून आमदार म्हणून विधानसभेत पाठविले होते. हे जयवंतराव जगताप यांचे खुप मोठे यश व खुप मोठा राजकीय तजुरब्याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. मात्र एखाद्याला केलेल्या मदतीचा अगर दिलेल्या खंबीर पाठबळाचा वापर त्यांनी जगताप गटाच्या वाढीला अगर स्वतःच्या राजकीय स्वार्थाला कधीच करून घेतलेला पहावयास मिळत नाही.उलट याठिकाणी संजयमामाच्या आमदारकीचा फायदा प्रत्येक राजकीय सत्तास्थानात जयवंतराव जगताप यांचेजागी दुसरा कोणताही राजकीय गट असता तर निश्चित घेतला असता. परंतु जयवंतरावांचे स्वभावात व जगताप गटाच्या इतिहासातील वाटचालीतही असे कधी पहावयास मिळालेले नाही, मग माजी उपपंतप्रधान सुशीलकुमार शिंदे का असेना,त्यांचाही राजकीय उपयोग कुठे जगताप गटाने केलेला दिसत नाही. जगताप गटाचे नेकी करो,दर्या मे दालो असे काम असुन करमाळा तालुक्यातील सर्वात प्रथमचा राजकीय गट म्हणून जगताप गटाची ओळख आहे. त्यांचा निष्ठावान मतदार हा त्यांच्या विरोधकांची डोकेदुखी आहे म्हटले तरी चालेल. त्यामुळेच जगताप गट हा तालुक्याचा पालक असल्याचे मत राजकीय जाणकारांकडून व्यक्त होत आहे.आणि म्हणूनच या धिधानसभा निवडणुकीसाठी जयवंतराव जगताप यांच्याच निर्णयाकडे सर्वच इच्छुक काय संपुर्ण मतदार संघ डोळे लावून बसला असल्याचे मत राजकीय जाणकारांकडून व्यक्त होत आहे हे मात्र निश्चित !
                     
जयवंतराव जगताप यांनी या विधानसभा निवडणुकीत कोणालाही पाठिंबा न देता जर स्वतःच उमेदवारी अर्ज दाखल केला तर कदाचित वातावरण फिरूही शकते. राजकारणात कधी काय होईल याचा नेम नसतो हे जाणकार सांगतात त्यामध्ये निश्चित तथ्य असणार यात दुमत नाही. जयवंतराव जगताप यांनी आजपर्यन्त अनेक राजकीय सत्तास्थानांची पदांवर कामे करत गरजवंतांना न्याय देण्याचे काम केलेले आहे. 

आज करमाळा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आमदार संजय शिंदे,माजी आमदार नारायण पाटील,प्रा. रामदास झोळ,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे,भाजपचे गणेश चिवटे,यांच्या नावांची चर्चा होत आहे. आमदार संजयमामा शिंदेच्या व्यासपीठावर आम.शिंदें समोरच जयवंतराव जगताप म्हणाले होते ,मी कोणाला पाठिंबा देणार याची वाट पहाण्यापेक्षा तुम्हीच आता मला यावेळी पाठिंबा द्या काय होतय?मलाही दोन- तिन राजकीयपक्षांचीऑफरआहे.....या वाक्याची आजही सर्वत्र चर्चा होत असल्याने जयवंतराव जगताप यांचा नेमका निर्णय काय असेल याचीच प्रतिक्षा संपुर्ण करमाळा मतदार संघात होत आहे हे मात्र खरं !

कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंभुराजे जगताप यांनी विश्वास जुना-जगताप गट पुन्हा हा नारा देत सुरू केलेला गावभेट दौरा याचे द्योतक काय,याचे जाणकारांकडून तर्क-वितर्क लावले जात आहेत..
close