shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

बेलापूर खरेदी महोत्सवाचा विजयादशमीच्या मुहुर्तावर शुभारंभ


श्रीरामपूर / प्रतिनिधी:
एकेकाळी भरभराटीस असलेल्या तालुक्यातील बेलापूरच्या बाजारपेठेस उर्जितावस्था मिळवून देण्याच्या उद्देशाने बेलापूर ग्रामपंचायत,मर्चण्ट असोशिएशन, दि बेलापूर किराणा मर्चण्ट असोसिएशन व बेलापूर- ऐनतपूर ग्रामस्थ आयोजित "बेलापूर खरेदी महोत्सवाचा "विजयादशमीच्या मुहुर्तावर शुभारंभ करण्यात आला.     
तालुक्यातील बेलापूर येथे दसरा व दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर १२ आॕक्टोबर ते १५ नोव्हेंबर २०२४ या कालावधित खरेदी महोत्सवाचे आयोजन कारण्यात आले आहे." आपले गाव ,आपली खरेदी" असा या महोत्सविचा हेतू आहे. ग्रामस्थांनी गावातीलच व्यापारी,दुकानदार,व्यावसायिकांकडूनच खरेदी केल्यास गावाच्या  पैशाची गावातच उलाढाल होईल असे संयोजकांनी सांगीतले.               या महोत्सव अंतर्गत खरेदी करणाऱ्यांना टि.व्ही.एस प्लस मोटारसायकलसह २२१ आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.तरी बेलापूर-ऐनतपूर येथील ग्रामस्थांनी गावातच खरेदी करावी असे आवाहन ग्रामपंचायत बेलापूर,मर्चण्ट असोसिएशन, दि बेलापूर किराणा असोसिएशन तसेच ग्रामस्थांनी केले आहे.

*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
close