shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

आरोग्य खात्यात नोकरी लावण्याच्या आमिषाने केज मधील तात्या गाडवे सह सहा जणांना २८ लाख ६५ हजार घेवून ठकसेनाने फसवले !

प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी


आरोग्य विभागात नोकरी(एक्स-रे टेक्निशियन ) लावण्याचे आमिष दाखवून एकाने सहा जणांची फसवणूक करून त्यांच्या कडून २८ लाख ६५ हजार रु. उकळले असल्याचा खबळजनक प्रकार उघडकीस आला असून जर आरोपी पोलिसांच्या हाती लागला तर त्याने अशाच प्रकारे अनेकांना गंडा घालून कोट्यवधी रू. ची माया जमविली असल्याच्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून त्या ठकसेनाला पोलीस अधीक्षकांनी बेड्या ठोकून त्याचा पर्दाफाश करण्याची मागणी होत आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज येथील भगवान (तात्या )बिभीषन गाडवे हे  होतकरू तरुण चहाचे हॉटेल चालवितात. दि. २० ऑक्टोबर २०२२ रोजी त्यांच्या ओळखीचे अंकुश दामोदर मोरे रा. भालगाव ता. केज हे म्हणाले की, त्यांच्या ओळखीचे परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील लक्ष्मणआप्पा वैजनाथआप्पा मलंगे हे आरोग्य विभागात (एक्स-रे टेक्निशन  ) सह इतर तत्सम पदांवर नौकरी लावण्याचे काम करतात. त्यांची आरोग्य विभागातील गुप्ता नावाच्या एका बड्या साहेबांची ओळख आहे. 


तसेच अंकुश मोरे यांनी पण स्वतः त्यांच्या मुलाला नोकरी लावण्यासाठी दीड लाख रु. मलंगे यांना दिले आहेत. 
त्या नंतर भगवान(तात्या ) गाडवे यांची व लक्ष्मणआप्पा मलंगे यांची दि. ६ नोव्हेंबर २०२२ रोजी केज येथे भेट झाली. मलंगे त्यांना म्हणाला की एक्स-रे टेक्निशन या पदावरील नोकरीसाठी १२ लाख रु. लागतील. त्यासाठी पहिल्यांदा काही रक्कम द्यावी लागेल. असे सांगितले. 
दि. २० एप्रिल २०२३ रोजी पाच लाख रु. मागितले परंतु गाडवे यांच्याकडे तेवढे पैसे नव्हते म्हणून त्यांनी केज येथील त्यांच्या घरी सकाळी ११:३० वा. त्यांचे मित्र बाळासाहेब सव्वासे यांच्या समक्ष २ लाख २५ हजार रु. नगदी दिले. पैसे घेतल्या नंतर लक्ष्मणआप्पा मलंगे त्यांना म्हणाला की, एक ते दीड महिन्यात यादीत नाव येईल. यादीत नाव आल्यास ठरलेले पूर्ण पैसे द्यावे लागतील. असे म्हणून पैसे घेवून तो निघून गेला. 
त्या नंतर दि. २७ एप्रिल २०२३ रोजी मलंगे यांने भगवान गाडवे यास फोन वरून म्हणाला की, तो मुंबईला गेलेला असून आरोग्य विभागातील एका टेबलवर देण्यासाठी ५० हजार रु. पाठवून द्या. असे म्हणल्याने तेवढे पैसे नसल्याने भगवान गाडवे यांनी त्याला फोन-पे वर २५ हजार रु. पाठवून दिले.
त्या नंतर १६ मे २०२३ मलंगे याने भगवान (तात्या )गाडवे यांना कळविले की, आता अंतीम यादी लागणार असून त्यासाठी १५ हजार रु. पाठवा. पुन्हा गाडवे यांनी त्याला १५ हजार रु. फोन-पे वर पाठविले.

भगवान (तात्या )गाडवे यांनी मलंगे यांना एकूण २ लाख ६५ हजार दिले. त्या नंतर त्यांनी वारंवार ठकसेन मलंगे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचे सर्व मोबाईल नंबर बंद होते. 
त्यांनी ही माहिती अंकुश मोरे यांना दिली असता त्यांनी पण गाडवे यांना सांगितले की, मलंगे याने त्यांना पण दीड लाख रु. ला फसविले आहे.

तसेच अंकुश मोरे यांच्या ओळखीचे नंदकुमार उत्तमराव भोसले, संजय अभिमन्यू पुजदेकर, सुशील बालासाहेब मडके, अरुण रावसाहेब डोबळे यांचीही अशीच त्यांच्या नातेवाईकांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली आहे.
त्या नंतर गाडवे यांनी दि. ७ ऑक्टोबर रोजी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून लक्ष्मणआप्पा मलंगे यांच्या विरूद्ध गु. र. नं. ५३४/२०२४ भा. दं. वि. ४२० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक बालासाहेब रोडे हे करीत आहेत.
-----------------------------------------------------

*नातेवाईक यांना नोकरी लावण्याच्या उद्देशाने ठकसेन मलंगे कडून फसलेले :-*

१) भगवान उर्फ तात्या गाडवे -- २ लाख ६५ हजार रु
२) अंकुश मोरे -- १ लाख ५० हजार रु.
३) नंदकुमार भोसले -- १० लाख रु.
४) संजय पुजदेकर -- ८, लाख ८० हजार रु.
५) सुशील  मडके --- ३ लाख रु.
६) अरुण डोबळे --- ५ लाख रु.
                    -----
एकूण ----- २८ लाख ६५ हजार रु.
---------------------------------------------------

*पोलीस अधीक्षकानी या ठकसेनाचे चॅलेंज स्वीकारून तपास करायला हवा :-*

ठकसेन लक्षमणाप्पाला पोलिसांनी ताब्यात घेवून त्याच्या सर्व कृत्याचा पर्दाफाश केल्यास आणखी मोठे रॅकेट उघड होण्याशी शक्यता आहे.
-----------------------------------------------------------------------

*आरोग्य विभागातील तो अधिकारी कोण ? :-* लक्षणआप्पा मलंगे याने आरोग्य विभागात गुप्ता नावाच्या व्यक्तीची ओळख असल्याचे सांगून पैसे घेतले तो खरेच आहे किंवा नाही. हे देखील पहावे लागेल.
----------------------------------------------------------------------

*ठकसेन मलंगे याचा फोन सुरू मात्र तो स्वीकारत नाही :-* ठकसेन मलंगे हा फोन स्वीकारत नसून त्याचे सर्व फोन बंद असल्याने भगवान गाडवे यांनी दि. ५ सप्टेंबर २०२४ रोजी एक रुपया पाठविला असता ती रक्कम त्याच्या फोन-पे वर जमा झाली. म्हणजे त्याचा फोन नंबर सुरू आहे.

------------------
close