पुणे:-
महात्मा कबीर समता परिषद तर्फे देण्यात येणारा व महाराष्ट्रातील प्रतिष्ठीत समाजाला जाणारा महाराष्ट्रभूषण व जीवन गौरव पुरस्कारासाठी श्री. अशोक सोनाजी पवार यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील भरीव कार्याची दखल घेऊन व त्यानचे समाजातील योगदान लक्षात घेऊन सन २०२३-२४ या वर्षीचा महात्मा कबीर समता परिषद महाराष्ट्रभूषण जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. त्याचे सामाजिक कार्य समाज उपयोगी आहे
विशेषत: वडार समाजाचे मधू वर सूचक केंद्र व वधू वर पालक परिचय महामेळावे आयोजित करतात. तसेच वधू वर सूचक केंद्राचे महाराष्ट्रात सर्वात जास्त सभासद असलेले टेलिग्राम ग्रुप मुख्य एडमिन आहेत.
टेलिग्राम ग्रुप वय शिक्षणानुसार, जिल्हा नुसार दिव्यांग, घटस्फोटित, विधुर, विधवा, नोकरी, विषय मोठी सभासद असलेले अनेक ग्रुप आहेत. याशिवाय मागील अनेक अखिल भारतीय वडार बोली साहित्य संमेलन आयोजित करून यशस्वी केले आहेत. वडार समाजात जनसंपर्क दांडगा असल्याने बोटावर मोजणे इतके लेखक कवी असताना ४८+ पेक्षा जास्त लेखक व कवी कवियत्री ९० + पेक्षा जास्त माहिती संकलन करून त्यांना व्यासपीठ दिले आहे.
कोरोना काळात जगात सर्व ठप्प झाली असता ऑनलाईन वधू वर मेळावा, व्याख्यानमाला, कवी, लेखकांचे व्हिडिओ मागवून ऑनलाईन उपक्रम राबविले होते व दरवर्षी जागतिक महिला दिन आयोजित करून गुणवंत अनेक महिलांचा सन्मान केला आहे. कर्तबगार पुरुष व महिलाना पुरस्कार दिले आहेत.
सांस्कृतिक कला सादरीकरण कार्यक्रमास संधी उपलब्ध केले असुन अनेक अपघाती, गंभीर आजार, रूग्णांना, गरीब गरजू विद्यार्थ्यांना व तसेच गरीब विधवा ताईना लोक सहभागातून व त्यांचे सहकार्यातून देणगी स्वरुपात आर्थिक मदत मिळवून दिले आहेत. समाज विकास होण्यासाठी ते नेहमीच प्रयत्न करीत असतात. प्रसार माध्यमातून व्हॉट्स ॲप व टेलिग्राम, फेसबुक द्वारे अनेक प्रकारे विविध उपयोगी पोस्ट करून जन जागृती करण्याचे कार्य करीत आहेत.