प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. २/ करमाळा येथील पृथ्वी सोशल फाउंडेशनच्या वतीने श्री. कमलभवानी शारदीय नवरात्रौत्सव निमित्त खास महिलांसाठी नवरात्राचे ९ रंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आली आहे. सदर स्पर्धा कालावधी ३ ते ११ ऑक्टोबर दरम्यान आहे. ही स्पर्धा शहर तसेच ग्रामीण अशा दोन गटात असून १७ वर्षे पूर्ण व त्यापुढील युवती आणि महिला यात सहभाग घेऊ शकतात. या स्पर्धेसाठी नवरात्रातील नऊ दिवसाच्या रंगानुसार साडी परिधान केलेला एक फोटो काढून 8605782996 (संयोजिका Wattsup क्रमांक) या नंबर वर पाठवायाचा आहे. घरबसल्या महिलांना भरघोस बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी फाऊंडेशन द्वारे उपलब्ध करून दिलेली आहे.
या स्पर्धेत विजेत्यांना LED TV - प्रथम क्रमांक, केनस्टार कुलर - द्वितीय क्रमांक, मिक्सर - तृतीय क्रमांक, टेबल फॅन - चौथा क्रमांक, हॉट प्लेट शेगडी - पाचवा क्रमांक, ६ पैठणी साड्या - उत्तेजनार्थ बक्षिसे तसेच ड्रॉ पध्दतीने सुध्दा बक्षिसे प्रयोजकांमार्फत देण्यात येतील. शहरी व ग्रामीण दोन्ही गटात बक्षिसे असून जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा असे आवाहन संयोजन समिती मार्फत करण्यात येत आहे.