शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
शुक्रवार २५ ऑक्टोंबर २०२४
गोरगरिबांचा फायदा हेच व्यंकटेशने जपले -- मोहनरावजी देशमुख..!!
व्यंकटेश मल्टीस्टेटच्या बालमटाकळी शाखेचा 12 वा वर्धापन दिन , विविध कार्यक्रमाचे आयोजन..!!
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील बालमटाकळीचा स्वाभिमान असलेल्या व्यंकटेश फाउंडेशनच्या व्यंकटेश मल्टीस्टेट बालमटाकळी शाखेचा बारावा वर्धापन दिन हा खेळीमेळीत व आनंदाच्या वातावरणात संपन्न झाला असून मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते , व्यंकटेश फाउंडेशनचे संस्थापक आदिनाथ शिंदे सर , चेअरमन कृष्णाजी मसुरे सर , व्हाईस चेअरमन व्यंकटजी देशमुख , संचालक अनिल गुंजाळ यांनी व्यंकटेश फाउंडेशन नावा रूपाला आणून आज महाराष्ट्रात व महाराष्ट्रा बाहेर किमान ५० शाखेचा विस्तार करून गोशाळेच्या माध्यमातून विविध गोवंश जातीच्या गाईंचे पालनपोषण करीत आहेत , व्यंकटेश मल्टीस्टेट बालमटाकळीचा एक अभिमान असून महाराष्ट्रात बालमटाकळीचा नावलौकिक केला असल्याचे गौरवोद्गार सेवा संस्थेचे चेअरमन रामनाथजी राजपुरे यांनी काढले , तर मोहनराव देशमुख यांनी देखील व्यंकटेश मल्टीस्टेट विषयी बोलताना म्हणाले की , बँकेच्या माध्यमातून गोरगरिबांना फायदा कसा होईल हे त्यांनी जपले असून कारभारही उत्तम पद्धतीने चालू असल्याचे ते म्हणाले ,
यावेळी सेवा संस्थेचे माजी चेअरमन माणिकआप्पा शिंदे , व्हाईस चेअरमन व्यंकट देशमुख , मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव माने , शाखा व्यवस्थापक अमर गरड ,आदींसह कर्मचारी वृंद ,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600