shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

संग्राम जगताप यांच्या नामनिर्देशन पत्रावर मविआ काँग्रेस पक्षाचे बंडखोर उमेदवार किरण काळे यांनी घेतली गंभीर स्वरूपाची हरकत

नगर / प्रतिनिधी

याबाबत लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 चे कलम 36 (5) अन्वये गैरहरकतदार संग्राम अरुणकाका जगताप आणि हरकतदार किरण गुलाबराव काळे यांना नोटीस बजाविण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी सदर नोटीस बजावली असून हरकतदार व गैरहरकतदार यांना याबाबत सुनावणी कामी उपस्थित राहणे बाबत सूचित केली आहे. 

सदर पत्रात म्हटले आहे की,
१ .सदर सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत नॅशनलीस्ट काँग्रेस पार्टी तर्फे उमेदवार संग्राम अरुणकाका जगताप यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केला असुन सदर अर्जा मध्ये पान नं. १३ वाणिज्य इमारती २. मौजे चाहुराणा बु येथील टी.पी. स्कीम नं. ३ चा प्लॉट नं. ८/२ ते ११/४ हॉटेल राजश्री (४५% हिस्सा) सदर जागा मिळकत उमेदवाराने दि. २६/०६/२०१४ रोजी नोंदणीकृत दस्त नं. ३६६१/२०१४ अन्वये रककम रुपये १,८५,००,०००/- एक कोटी पंच्याशी लाख रुपयात हॉटेल राजश्री चे भागीदार १. अरुण बलभिम जगताप, २. सचिन अरुण जगताप, ३. संग्राम अरुण जगताप यांनी विकत घेतलेली आहे. सदर हॉटेल मिळकती शेजारी अहमदनगर महानगर पालिका अहमदनगर यांचा खरेदी मालकीची खुली जागा ३८५.२१ चौ. मी. आहे, तो मनपा यांनी खरेदीखत दस्त नं. ४५२४/२०१० दि. २०/०८/२०१० अन्वये खरेदी केलेला आहे, सदर खुल्या जागेचा वापर नगर रचना नियमानुसार बगीचा, ग्रंथालय, कलब इ. साठी करण्याची तरतुद आहे. सदर मनपाच्या मालकीच्या खुलया मोकळ्या जागेत उमेदवार संग्राम अरुण जगताप यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून धाक, दडपशाही, दादगिरीने ताबा मारुन मोठे मोठे खड्डे घेउन ते बळकवण्यासाठी तेथे मोठे जनरेटर ठेउन बळकावला आहे. सदर मनपाच्च्या मालकीचा मोकळी जागा आपल्या पदाचा गैरवापर करून बळकावल्यामुळे सामान्य नगरकरांना बगीचा, ग्रंथालय, क्लब हाउस या नागरी सुविधांपासुन मागील १० वर्षापासुन जाणिवपुर्वक वंचित ठेवले आहे, तसेच सदरचे गैरकृत्य हे लोकप्रतिनिधी कायदा कलम ८अ व ९ यांचे भंग करणारे आहे व भारतीय दंड विधान कलम १७१ क चे भंग करणारे गंभीर गुन्हा आहे व निवडणुक आयोग चे दि. २७/०२/२०२४ पॅरा ३३ मधील निर्देशाचे उल्लंघन आहे. त्यामुळे सदर उमेदवार संग्राम अरुणकाका जगताप यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात यावा.

२. उमेदवार संग्राम अरुणकाका जगताप यांनी नगर शहराच्या प्रमुख चौकात स्वतःचे अनाधिकृत होलडींग लाउन नवा इतीहास घडत आहे, नगरचे भाग्य बदलत आहे, १५० कोटीच्या कामांना प्रत्यक्षात सुरुवात, अशा प्रकारचे फलेकस बोर्ड लाउन सदर विकास कामे हे स्वतः त्यांच्या निधीमधुन करत आहे असा खोटा आभास निर्माण करून सामान्य नगरकरांची दिशाभुल करून त्यांची घोर फसवणुक केली आहे.

वास्तवीक सदर रस्ते महाराष्ट्र शासनाच्या नगर उश्थान योजनेतील २७ रस्ते असुन त्यास केवळ राज्या शासनाकडुन पहीला हफता ३४ कोटी रुपये आलेले आहे त्यात अहमदनगर महानगरपालिका यांचा हिस्सा देणे बंधनकारक असताना सदर हिस्सा देण्यात मनपाने कोणतीही तरतुद बैंक खाते उघडुन केलेली नाही म्हणुन उमेदवार संग्राम अरुणकाका जगताप यांची खोटी बॅनरबाजीच्या माध्यमातुन जनतेला खोटा आभास निर्माण करून मी विकास पुरुष, कार्यसम्राट आहे अशी बतावणी करून जनतेमध्ये खोटा प्रचार सुरु ठेवलेला आहे. सदर प्रचार हा लोकप्रतीनिधी कायदा कलम ८अ व ९ व भारतीय दंड विधान कलम १७१ अ. १७१ब, १७१क चा भंग करणारा असुन तो गंभीर स्वरुपाचा फौजदारी गुन्हा आहे, तसेच भारतीय संविधानाचे आर्टिकल १९१ चा भंग आहे त्यामुळे या कारणास्तव उमेदवार संग्राम अरुणकाका जगताप यांचा उमेवारी अर्ज फेटाळण्यात यावा व त्यांना अपात्र घोषीत करण्यात यावे.

३. उमेदवार विधानसभा सदस्य संग्राम अरुणकाका जगताप यांच्याकडुन आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करुन बेकायदेशीरपणे सार्वजनीक वाहनांच्या काचांवर स्वतःचा फोटो व पक्ष चिन्ह यांची जाहिरात करून आचार संहितेचे उललंघन केलयाबाबत प्रादेशीक परिवहन अधिकारी, आहिलयानगर यांनी वाहन नं. MH १६BY ०३९७ व MH१६ DM ०८०० या वाहन विना परवाना जाहिरात चिटकवलेले आढळुन आले त्यावर देखील दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे असे पत्र जा.क. २५९८ दि. २२/१०/२०२४ अन्वये मा. सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी २२५, अहमदनगर यांना दिलेले आहे. सदर गैरकृत्य गंभीर स्वरुपाचा गुन्हा मोटर व्हेइकल अॅकट २०१९ अन्वये आहे या ही कारणास्तव उमेदवार संग्राम अरुणकाका जगताप यांचा उमेवारी अर्ज फेटाळण्यात यावा व त्यांना अपात्र घोषीत करण्यात यावे.

४. उमेदवार संग्राम अरुणकाका जगताप यांनी शासनाची लाडकी बहीण योजनेची जाहिरीत करताना स्वतःचा फोटो लाउन शहराच्या प्रमुख चौका मध्ये सदर शासनाच्या योजनेचे ते स्वतःचा फोटो बॅनर लावुन त्या योजनेचे पैसे स्वतः देत आहे व त्यांच्यामुळे जनतेच्या महिलांना सदर योजनेचा लाभ मिळत आहे असा खोटा बनाव, आभास निर्माण करुन जनतेच्या मनात विकास पुरुष, कार्यसम्राट अशी स्वतःची प्रतीमा निर्माण करून जनतेची दिशाभुल करून जनतेची फसवणुक केलेली आहे त्यामुळे सदर गैरकृत्य हे भारतीय दंड विधान कलम १७१अ, १७१ब, १७१ क चे भंग करणारे असुन गंभीर स्वरुपाचा फौजदारी गुन्हा आहे त्यामुळे यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात यावा व त्यांना अपात्र घोषीत करण्यात यावे.

५. उमेदवार संग्राम जगताप यांनी नामनिर्देशन अर्ज च्या पान नं. २ वर स्वतःचे नाव संग्राम अरुणकाका जगताप PAN No. AJHPJ ८५७१४ व वडिलांचे नाव अरुणकाका बलभिम जगताप असे लिहीले आहे. सदर माहिती शासकीय पॅन कार्ड मधील माहिती प्रमाणे पॅन कार्ड मध्ये उमेदवाराचे नाव संग्राम अरुणकाका जगताप यांच्या वडिलांच्या पॅन कार्ड मध्ये अरुण बलभिम जगताप PAN No. AEJPJ ७०४७P व सचिन अरुण जगताप यांच्या PAN No. AEJPJ ७०४९ D अशा नावाचा उललेख आहे, सदर पॅनकार्ड शासकीय दस्तरैवजात उमेदवारांच्या वडिलांच्या नावाचा अरुण असा उललेख आहे, असे असताना नामनिर्देश अर्जामध्ये वडीलांचे नाव अरुणकाका लिहुन खोटी माहिती सादर केलया प्रकरणी उमेदवार संग्राम जगताप यांचा नामनिदेर्शन अर्ज फेटाळण्यात यावा व त्यांना अपात्र घोषीत करण्यात यावे.

६. उमेदवार संग्राम जगताप यांनी नगर शहराच्या प्रमुख चौकात पत्रकार चौक, प्रोफेसर कॉलनी चौक, पुणा रोड येथे मोठे मोठे होर्डिंग लाउन कोणतीही पुर्व परवानगी न घेता विश्वास जुना संग्राम भैय्या पुन्हा अशी जाहिरीत करुण खोटा पोकळ आभास निर्माण करुन जनतेच्या मनात आपण विकास पुरुष, कार्यसम्राट असुन मागील १० वर्षात असे कोणतेही जनहितार्थ भरीव काम न करता कालपनीक प्रतीमा, भव्य दिव्य चमत्कारी माणुस असा बवाव तयार करून जनतेच्या मनात गैरसमज निर्माण करुन त्यांना पुन्हा जनतेने त्यांच्या खोटया भुलथापांना बळी पडुन निवडुन दयावे असा खोटा देखावा निर्माण केलया प्रकरणी व जनतेची फसवणुक केलया प्रकरणी यांचा नामनिदेर्शन अर्ज फेटाळण्यात यावा व त्यांना अपात्र घोषीत करण्यात यावे. सदर अनाधिकृत होर्डीग फलेकस मा. जिलहाधीकारी साहेब यांच्या आदेशाने काढण्यात आलेले आहे.

७. उमेदवार संग्राम जगताप यांनी MIDC येथील आय.टी पार्क मध्ये हजारो तरुनांनसाठी रोजगाराच्या संधी नगरमध्ये उपलब्ध करून दिलया अशा प्रकारचा रोजगार मेळावा घेउन खोटा आभास निर्माण करुन बेरोजगार युवक नागरीक यांना खोटे स्वप्न, नगर स्मार्ट सिटी, मेटोसीटी च्या दिशेने पुढे जात आहे, असे दिवा स्वप्न नगरकरांना दाखवुन त्यांच्या मनात बनावट कालपनीक चित्र निर्माण करुन तापमानये, याममा में सामान्या नगरकरांना नागरी सुवीधापासुन वंचीत ठेवणे अशा प्रकारचे गैरकृत्य करून जनतेची फसवणुक केलया प्रकरणी व लोकप्रतीनीधी कायदा कलम ८अ व ९, भारतीय दंड विधान कलम १७१ क अत्यंत गंभीर स्वरुपाचा गुन्हा केला आहे, त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात यावा.

८. उमेदवार संग्राम जगताप यांनी त्यांच्या अर्ज पान न.४ मधील कॉलम ५ड मध्ये अपराधाचे संक्षीप्त वर्णन या मध्ये अंतीम अहवाल सादर केला न्यायालयात प्रलंबीत सबळ व योग्य पुरावा मिळुन न आलयाने असा उललेख केला आहे. या प्रकरणी मा. न्यायालयाने कोणताही अंतीम आदेश पारीत केलेला नसतानाही, खोटी माहिती व खोटे प्रतीज्ञापत्र सादर केलया प्रकरणी उमेदवार संग्राम जगताप यांचा उमेदवारी अर्ज लोकप्रतीनीधी कायदा चे कलम ३३, १२५ अ खोटे प्रतिज्ञापत्र सादर केलया प्रकरणी फेटाळण्यात यावा व त्यांना अपात्र घोषीत करण्यात यावे.. ९. उमेदवार संग्राम जगताप हे प्रेरणा पतसंस्था, सं सो नर्स, पदाधीकारी असुन लाभाचे पद धारण केल्या प्रकरणी त्यांना भारतीय संवीधान आर्टिकल १९१ (१) अ अन्वये त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात यावा व त्यांना भारतीय संवीधानाच्या आर्टिकल १९१ चे उल्लंघन केलया प्रकरणी अपात्र करण्यात यावे.

तरी संग्राम अरुणकाका जगताप यांनी लोकप्रतिनिधी कायदा कलम ८अ व ९, भारतीय दंड विधान कलम १७१अ, १७१ब, १७१क चे भंग करून गंभीर स्वरुपाचा फौजदारी गुन्हा केला आहे. तसेच भारतीय संवीधानाच्या आर्टिकल १९१ चे उल्लंघन केलया प्रकरणी त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात यावा व त्यांना अपात्र करण्यात यावे असे सदर पत्रात म्हटले आहे .
close