shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

निर्मलनगर येथे किर्तनकार ह.भ.प. शिवलीला ताई पाटील यांचा किर्तन सोहळा संपन्न ...


नवरात्री निमित्त सेवार्थ प्रतिष्ठाणचा कौतुकास्पद उपक्रम

प्रतिनिधी : संजय वायकर

अहिल्यानगर : दि . ९ /    अहिल्यानगर च्या सावेडी उपनगरातील निर्मलनगर  येथील  सेवार्थ प्रतिष्ठाणचे संस्थापक मा. वैभव भाऊ पोकळे यांच्या वतीने प्रतिष्ठाण मार्फत सार्वजनिक शारदीय नवरात्र उत्सवाचे आयोजन  मोठ्या उत्साहात करण्यात आले .

या नवरात्री उत्सव निमित्ताने मा. नगरसेवक सुनिल नारायण त्र्यंबके यांच्या प्रमुख उपस्थितीत किर्तनकार ह.भ.प. शिवलीला ताई पाटील यांच्या किर्तन सोहळ्याचे  मंगळवार दि . ८ ऑक्टोबर रोजी आयोजन करण्यात आले . यावेळी असंख्य महिलांनी व नागरिकांनी किर्तनाचा लाभ घेतला . यावेळी महाआरती करण्यात आली .ह.भ.प. शिवलीला ताई पाटील यांच्या सुश्राव्य किर्तनाचा सर्व नागरिकांनी तल्लीन होवून आनंद घेतला . सेवार्थ प्रतिष्ठाण मार्फत नेहमीच सामाजिक उपक्रम राबविले जातात . या धार्मिक कार्यक्रमाचे सर्वच नागरिकांमधुन कौतुक होताना दिसून आले .

 या प्रसंगी सेवार्थ प्रतिष्ठाण चे शेखर काते ,सोनू रोकडे,गणेश लोखंडे, राहुल जाधव ,सुमित भोगे ,सागर गोरे, अक्षय गांगर्डे ,ऋषिकेश गोपाळघरे, सौरभ तागड , मयूर टकले , साहिल सय्यद , यश सरोदे , योगेश चौधरी ,संदीप कदम , विरेंद्र जरे , समाधान दीक्षित, कृष्णा वाघमारे, दिपक साबळे आदी युवक कार्यकर्ते उपस्थित होते .
close