अभिजात मराठीसाठी मराठी विषय महासंघाचे भरीव योगदान, अभिनंदनाचा ठराव संमत
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
माय मराठीला अडीच हजार वर्षांपेक्षा जुनी परंपरा असून मराठीला संत व साहित्यिकांनी दर्जेदार साहित्याची अनमोल देणगी दिली आहे. जगातील असंख्य विद्यापीठात मराठीला श्रेष्ठ दर्जा प्राप्त झालेला असून मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी मराठी भाषकांचे योगदान मोलाचे आहे, असे मत कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय महासंघाचे राज्य अध्यक्ष सुनील डिसले यांनी व्यक्त केले.
मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात दर्जाविषयी राज्य सरकार, केंद्र सरकार, साहित्यिक आणि मराठी भाषकांच्या योगदानाबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडण्याच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक राज्य महासंघाच्या वतीने नुकतेच आभासी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीचे प्रास्ताविक व स्वागत दिलीप जाधव यांनी केले. तर सभेच्या बैठकीची भूमिका आणि ठराव सचिव बाळासाहेब माने यांनी मांडला. यावेळी कार्याध्यक्ष डाॅ. मनीषा रिठे, कार्याध्यक्ष संपत गर्जे, उपाध्यक्ष प्रतिमा बिस्वास,उपाध्यक्ष ज्ञानेश हटवार, विजय हेलवटे, बापू खाडे, दीपा ठाणेकर, मंजिरी गजरे, ओमप्रकाश ढोरे, विजया मने यांनी आपल्या मनोगतातून अभिजात मराठीला दर्जा प्राप्त करून देणाऱ्या सर्वच मराठी भाषकांबद्दल धन्यवाद व्यक्त केले. यावेळी अध्यक्षीय भाषणातून सुनील डिसले यांनी अभिजात मराठीसाठी महासंघाने केलेला संघर्ष आणि या संघर्षाचे मिळालेले फळ, राज्य व केंद्र सरकारचे योगदान, साहित्यिकांचा पाठपुरावा याबद्दल सर्वांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. यावेळी डॉ. शरद दुधाट, मीनल पाटील, व्यंकट दुडीले, सुरेश नखाते, नीता खोत, गिरीश काळे, योगेंद्र सनेर, चांगदेव खोले, रेखा कटके, सुनील कारवले, नामदेव मोरे, संतोष कोठावळे, संतोष कदम, स्मिता भुसे, भाग्यदेवी चौगुले, अंजना खताळ, अंजना देवकाते, बाबासाहेब माळवे, यशवंत पवार, अरविंद मोडक, निलेश पाकदुने यांच्यासह राज्य कार्यकारिणीतील सदस्य व राज्यातील ३५ जिल्ह्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या सभेचे आभार संजय लेनगुरे यांनी मानले.
*वृत्त विशेष सहयोग
डॉ.शरद दुधाट - श्रीरामपूर
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११