shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

भोकर येथील जगदंबा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना २१७२ वह्याचे मोफत वितरण


श्रीरामपूर / प्रतिनिधी:
विद्यार्थी स्वयं प्रकाशीत व्हावेत, आदर्श विद्यार्थी बनावेत यासाठी बारामती कॅटल फीड्सच्या माध्यमातून एक मुल भविष्यासाठी व एक वही विद्यार्थ्यांसाठी संकल्पनेतून विद्यार्थ्यांना मदत केली जाते. आजपर्यंत २८ लाख वह्यांचे मोफत वितरण करण्यात आले, त्याच बरोबर इतर ही मदत कंपनीकडून करण्यात येते मात्र त्यासाठी शाळेची व विद्यार्थ्यांची गुणवत्ता व प्रतिसाद महत्वाचा असतो असे प्रतिपादन बारामती कॅटल फीड्सचे प्रतिनिधी धिरज बोरसे यांनी सांगीतले. 

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील श्री जगदंबा प्रासादिक विद्यालयास अपेक्षीत असलेले बारामती अ‍ॅग्रो फीड्सच्यावतीने नुकत्याच २१७२ वह्यांचे मोफत वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अशोक कारखाण्याचे माजी व्हा. चेअरमन पुंजाहरी शिंदे हे होते तर सरपंच सौ. शितलताई पटारे, विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक डॉ. अविनाश महाजन, शाळाव्यावस्थापन समीतीचे अध्यक्ष रावसाहेब लोखंडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक भिमाशंकर शेळके, भाऊसाहेब चव्हाण, सोसायटीचे चेअरमन आण्णासाहेब काळे, भाजपाचे तालुकाध्यक्ष भाऊराव सुडके, संघटक सतीष शेळके, पोलीस पाटील बाबासाहेब साळवे, रिपाईचे सुरेश अमोलीक, ज्ञानेश्वर शिंदे आदि प्रमुख उपस्थित होते.
श्रीरामपूर तालुक्यातील ५२ गावे व १८ वाड्यांवर असलेल्या शाळांपैकी एक गाव एक शाळा दत्तक घेण्याची कंपनीची संकल्पना आहे. त्यानुसार तालुक्यातील आठ शाळांची निवड करण्यात आली आहे, त्यात भोकरच्या जगदंबा विद्यालयाचा समावेश आहे. विद्यालयाच्या मुख्याध्यापकांच्या मागणी नुसार या विद्यालयासाठी आवश्यक असलेले आर ओ वॉटर फिल्टर यंत्रणेसाठी कपंनीकडे प्रस्ताव सादर करण्यात येईल व मंजूरी नुसार या मागणीची पुर्तता करण्यात येईल मात्र त्यासाठी विद्यालयाचे यश, गुणवत्ता तसेच विद्यार्थ्यांची गुणवत्ता व प्रतिसाद आवश्यक आहे. या करीता दोघांनीही परीश्रम घेत आपल्या गुणवत्तेत वाढ करावी. विद्यार्थ्यांनी विद्यालयासाठी नव्हे तर स्वत:साठी परीश्रम घेण्याची गरज असल्याचे ही यावेळी बोरसे यांनी सांगीतले.

यावेळी अशोकचे माजी व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे यांनी विद्यालयाने विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांनाची जोपसना करत अभ्यासकडे लक्ष दिल्यास त्याचे उज्वल भवितव्य घडणार आहे, त्याच बरोबर गावाचे व विद्यालयाचे नाव मोठे होत असते. यात पालकांसह सर्वांचाच सहभाग महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगीतले तर विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक यांनी आम्ही ग्रामीण भागात आहोत. बदलत्या हवामानानुसार व पद्धतीनुसार शाळेसाठी व विद्यालयासाठी आर ओ ही जलशुद्धीकरण यंत्रणा अत्यावश्यक आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहणार असल्याचे त्यांनी सांगीतले.
यावेळी कचरू वाकडे, राजेंद्र चौधरी, भारत छल्लारे, समाधान विधाटे, मोहन गाढे, बाबासाहेब वाकडे, प्रशांत पवार, ज्ञानेश्वर भवार, संभाजी मते, राहुल पवार, संकेत शिंदे, अभिजीत विधाटे, अजय मते, साहेबराव पांढरे आदिंसह पालक व ग्रामस्थ उपस्थीत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.अविनाश महाजन यांनी केले सुत्रसंचालन राहुल डावरे यांनी केले तर सचीन शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाचे सहकारी शिक्षक व सेवकवृंद यांनी विशेष परीश्रम घेतले.

भोकर येथील जगदंबा प्रासादिक विद्यालय येथे बारामती कॅटल फिड्सच्यावतीने विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वितरण प्रसंगी कंपनीचे धिरज बोरसे समवेत पुंजाहरी शिंदे, सौ. शितलताई पटारे, डॉ. अविनाश महाजन, रावसाहेब लोखंडे,  भिमाशंकर शेळके, भाऊसाहेब चव्हाण, आण्णासाहेब काळे, भाऊराव सुडके, सतीष शेळके, बाबासाहेब साळवे, सुरेश अमोलीक, ज्ञानेश्वर शिंदे आदिंसह मान्यवर दिसत आहेत.

वृत्त विशेष सहयोग
पत्रकार चंद्रकांत झुरंगे-भोकर
संकलन 
समता न्यूज सर्व्हिसेस,श्रीरामपूर.9561174111
close