shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी लुटला कोजागिरी पौर्णिमेचा आनंद


दांडिया व रास-गरबावर नृत्याचे सादरीकरण

होतकरु विद्यार्थ्यांच्या पंखात बळ निर्माण करण्याचे काम नाईट हायस्कूल करत आहे -डॉ. पारस कोठारी

  प्रतिनिधी : संजय वायकर

 शहरातील भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये कोजागिरी पौर्णिमेचा विद्यार्थिनींनी आनंद लुटला. दांडिया व रास- गरबाचा कार्यक्रम यावेळी रंगला होता. दिवसभर अर्थार्जन व कौटुंबिक जबाबदारी सांभाळून रात्री ज्ञानार्जन करणाऱ्या महिला व युवती या कार्यक्रमात दांडियाच्या तालावर थिरकल्या. पारंपारिक वेशभुषेतील युवती व महिला मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाल्या होत्या. रात्रशाळेतील विद्यार्थी- विद्यार्थिनींना विविध सण-उत्सवाचा आनंद घेण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 या कार्यक्रमाप्रसंगी हिंद सेवा मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक अजितशेठ बोरा, नाईट हायस्कूलचे चेअरमन डॉ. पारस कोठारी, रोटरी प्रियदर्शनीच्या अध्यक्षा मिनलताई बोरा यांनी दांडिया गरबा नृत्य शुभारंभ प्रसंगी विद्यार्थिनी महिला यांचे शिक्षणाबाबत असणाऱ्या तळमळीचे कौतुक करून पुढील काळात रोटरी प्रियदर्शनी मार्फत गरजवंत महिलांसाठी आरोग्य व शैक्षणिक दृष्टीने महत्त्वाचे  कार्य करण्याचे आश्वासन दिले, रात्रशाळेचे प्राचार्य सुनिल सुसरे,कविता बोरा,पार्वतीबाई डहाणूकर कन्या विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका निर्मलाताई भंडारी आदींसह विद्याथी, दांडिया व गरबा नृत्य प्रमुख म्हणून जबाबदारी घेतलेली विद्यार्थिनी रोहिणी भोसले (गायकवाड),पालक प्राची शेटिया, स्मिता गांधी, पुनम बारगळ, सिमरन शेख, दीपक डोईफोडे, प्रवीण पगारे व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

या कार्यक्रम प्रसंगी निर्मलाताई भंडारी यांनी शाळेस 30 दांडिया सेट भेट स्वरूपात दिले त्याबद्दल त्यांचे आभार मानतात आले
भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय संचलित जन शिक्षण संस्थेच्या अशासकीय सदस्यपदी नाईट हायस्कूलची विद्यार्थिनी ज्योती गायकवाड (पगारे) हिची नियुक्ती झाल्याबद्दल शाळेच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. डॉ. पारस कोठारी म्हणाले की, नाईट हायस्कूलचे विद्यार्थी रात्रशाळेत शिक्षण घेऊन समाजात आपले कर्तृत्व सिध्द करत आहे. त्यांनी मिळवलेले यश संस्थेच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. होतकरु विद्यार्थ्यांना भरारी घेण्यासाठी त्यांच्या पंखात बळ निर्माण करण्याचे काम भाई सथ्था नाईट हायस्कूल करत असल्याचे त्यांनी सांगितले. ज्योती गायकवाड या विद्यार्थिनीचे संस्थेचे अध्यक्ष शिरीष मोडक कार्याध्यक्ष अनंत फडणीस व मानद सचिव संजय जोशी यांनी अभिनंदन करून तिच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

 शाळेच्या मैदानात झालेल्या कोजागिरीच्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थिनींनी पारंपारिक वेशभूषेत दांडिया नृत्याचे बहारदार सादरीकरण केले. दांडिया नृत्याच्या कार्यक्रमात युवतींचा उत्साह संचारला होता. 

यावेळी शालेय शिक्षक गजेंद्र गाडगीळ,अमोल कदम, महादेव राऊत, उज्वला साठे, वैशाली दुराफे, शिवप्रसाद शिंदे, गजेंद्र गाडगीळ, वृषाली साताळकर, संदेश पिपाडा, शरद पवार, मंगेश भुते, कैलास करांडे, प्रशांत शिंदे, अशोक शिंदे, स्वाती होले, ओंकार भिंगारदिवे,अनिरुद्ध देशमुख, अनिरुद्ध कुलकर्णी, संदीप कुलकर्णी,अविनाश गवळी, मनोज कोंडेजकर, कैलास बालटे आदी उपस्थित होते .
close