shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

१५ वर्षांपासून पक्षाचे निष्ठेने काम करतोय - सुहास घोलप

उमेदवारीच्या स्पर्धेत सुहास घोलप यांची उडी

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. २३/ महायुतीकडून करमाळा मतदार संघासाठीच्या उमेदवारी बाबत अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही. मात्र महायुतीच्या उमेदवारीसाठी तालुक्यातील शिवसेना आणि भाजप पदाधिकाऱ्यांत रस्सीखेच सुरु आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी अनेकजण इच्छुक असतानाच मंगळवारी भाजपा प्रज्ञासेलचे जिल्हाध्यक्ष सुहास घोलप यांनीही या स्पर्धेत उडी घेतली असून पंधरा वर्षांपासून निष्ठेने केलेल्या कामाची दखल घेऊन भाजपाने उमेदवारी देण्याची मागणी केली आहे.

मंगळवारी दुपारी चार वाजता कानाड गल्ली येथील कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन घोलप यांनी आपली दावेदारी स्पष्ट केली आहे. या पत्रकार परिषदेत बोलताना घोलप यांनी सांगितले आहे की, यापूर्वी महायुतीतून अनेक वेळा करमाळा विधानसभेची जागा शिवसेनेला सोडण्यात आलेली आहे. यावेळी ही संधी भाजपाला मिळणे अपेक्षित आहे. ही जागा भाजपाला मिळाली तरी उमेदवारी देताना मात्र पक्षाने निष्ठावंतांनाच उमेदवारी द्यावी. गेल्या पंधरा वर्षांपासून संघ कार्य, भाजपा प्रज्ञा सेल, वंदे मातरम शक्ती सेना, पत्रकार संघटना, सनिश्री चॅरिटेबल ट्रस्ट, आरटीआय मानवाधिकार संघटना आदींच्या माध्यमातून समाजसेवेसह पक्षकार्यही निष्ठेने केले आहे. त्यामुळे तालुक्यातील मोठा जनसंपर्क पाहता करमाळा विधानसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे घोलप यांनी म्हटले आहे.

यावेळी वंदे मातरम शक्तीसेनेचे राज्य समन्वयक दिनेश घोलप, प्रज्ञासेल तालुका अध्यक्ष नितीन घोडेगावकर, उदय गोडगे, सुर्यकांत होनप, उमेश निमगिरे, गणेश घोलप, राज चोपडे, बालाजी पवार, सर्फराज शेख, समीर मणेरी, मुन्ना पठाण आदी भाजपा आणि वंदे मातरम शक्ती सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
close