shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप ; मुंबई येथील आरीन फाऊंडेशनचे योगदान

आरीन फाऊंडेशनने  विद्यार्थ्यांना दिलेले पाठबळ कौतुकास्पद -डॉ. पारस कोठारी

प्रतिनिधी : आसावरी वायकर

अहिल्यानगर :  हिंद सेवा मंडळाच्या भाई सथ्था नाईट हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना मुंबई येथील आरीन फाऊंडेशनच्या वतीने स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. हिंद सेवा मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक अजितशेठ बोरा व नाईट हायस्कूलचे चेअरमन डॉ. पारस कोठारी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बॅगचे वितरण करण्यात आले.

 यावेळी रोटरी प्रियदर्शनीच्या अध्यक्षा मिनलताई बोरा, रात्रशाळेचे प्राचार्य सुनिल सुसरे, कविता बोरा, पार्वतीबाई डहाणूकर कन्या विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका निर्मलाताई भंडारी, नवनीत प्रकाशनचे नगर जिल्हा प्रतिनिधी श्री संजय पाठक,रोहिणी भोसले-गायकवाड, पालक प्राची शेटिया, स्मिता गांधी, पुनम बारगळ, सिमरन शेख, दीपक डोईफोडे, प्रवीण पगारे आदींसह शालेय विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.
 
डॉ. पारस कोठारी म्हणाले की, आपल्या उज्वल भवितव्यासाठी अर्धवट राहिलेले शिक्षण विद्यार्थी रात्रशाळेच्या माध्यमातून पूर्ण करत आहे. आपली कौटुंबिक जबाबदारी सांभाळून स्वतःचे शिक्षण पूर्ण करत असताना स्वतःसाठी शैक्षणिक साहित्य खरेदी करणे शक्य होत नसल्याने संस्थेचे अध्यक्ष श्री मोडक सर,कार्याध्यक्ष श्री,अनंत फडणीस, मानद सचिव संजय जोशी व शालेय समिती अशा गरीब कष्टकरी,होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात प्रयत्नाचेच यश आरीन  फाउंडेशनने विद्यार्थ्यांसाठी शंभर बॅग उपलब्ध करून दिल्या आहेत. रात्रशाळेत गरजवंत होतकरु वर्गातील युवक-युवती, महिला शिक्षण घेत असून, त्यांना आधार देण्यासाठी मुंबई येथील आरीन फाऊंडेशनने दिलेले पाठबळ कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. 

अजितशेठ बोरा म्हणाले की, आपल्या रात्रशाळेतून घडलेले विद्यार्थी विविध क्षेत्रात आघाडीवर आहेत. त्यांनी मिळवलेले यश हे इतरांपेक्षा अभिमानास्पद आहे. स्वकर्तृत्वाने त्यांनी आपली यशोशिखरे गाठले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्राचार्य सुनिल सुसरे यांनी माहिती देताना आरीन फाऊंडेशन ही संस्था मुंबई येथील असून संस्थेचे संस्थापक श्री नितेश मिसाळ असून यावर्षी त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत केलेली आहे असे सांगितले. समाजातील शिक्षणापासून वंचित राहिलेल्या रात्रशाळेतील पुनर्प्रवेशित विद्यार्थ्यांना, महिलांना मिळालेली बॅग अतिशय उपयुक्त ठरणार आहे. श्री. नितेश मिसाळ सर व आरीन फाउंडेशनचे व्यवस्थापक श्री.किरण जाधव सर व सर्व पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांसाठी शालेय बॅग उपलब्ध करुन दिल्याबद्दल प्राचार्य सुनील सुसरे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शरद पवार सर यांनी केले.

या कार्यक्रम प्रसंगी शिक्षक सर्वश्री शिक्षक गजेंद्र गाडगीळ, महादेव राऊत, अमोल कदम, शिवप्रसाद शिंदे, बाळू गोरडे, संदेश पिपाडा,मंगेश भुते, अशोक शिंदे, कैलास करांडे, प्रशांत शिंदे, अनिरुद्ध देशमुख, अनिरुद्ध कुलकर्णी, संदीप कुलकर्णी, अविनाश गवळी, मनोज कोंडेजकर, कैलास बालटे श्रीमती उज्वला साठे, वैशाली दुराफे, वृषाली साताळकर, स्वाती होले, अनुराधा गायके मॅडम उपस्थित होते.
close