shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

विधानसभा उमेदवार निश्चित करताय! उमेदवाराचे चारित्र्य बघणार का..


उमेदवाराचा व्यवसाय बघणार का..

उमेदवाराचे शिक्षण बघणार का..

उमेदवाराची मतदाराला उपलब्धता बघणार का..

स्वतः चे कष्टातून सामाजिक काम काय.. बघणार का..

तुमच्या गावात गल्लीत दहावे, लग्न सोडून गावाचे विकास कामांवर भेटी दिल्या काय.. बघणार का..

ग्रामसभा, वार्ड सभांना हजेरी लावून जनतेच्या समस्या ऐकल्या का.. हे बघणार का..

उमेदवार तुमच्या गावाव गल्लीत एकटा कधी आला काय.. बघणार का..

तुमचे आणि लोकप्रतिनिधीची प्रत्यक्ष शेवटची भेट आठवावी.. 

उमेदवाराचे व वाळू तस्कर, ठेकेदार, भ्रष्टाचारी, गुंड, यांचे सोबतचे संबंध कसे व किती घनिष्ट... बघणार का..

शासकिय पैशातुन झालेल्या गुणवत्तेबाबत कधी कोणाला जाब विचारला काय.. बघणार का..

उमेदवार व त्याचे कुटु़ंबीय (राजकिय घराणे) उत्पन्नाचे श्रोत काय... बघणार का..

उमेदवारांची समाजावर असलेली दहशत.. कधी बघणार का..

उमेदवाराचा प्रामाणिकपणा.. त्याच्या मतदारा सोबत, त्याचे पक्षा सोबत, त्याचे नेत्यांसोबत, गावा सोबत.. बघणार का

 *तुमच्या मनात उमेदवार निश्चित करण्यापूर्वी त्याचे वरील गुण तपासूनच उमेदवार निश्चित करा*

*संजय बबुताई भास्करराव काळे*

*कोपरगाव विधानसभा २०२४  चा इच्छूक उमेदवार*
close