*" ग्रामीण भागातून संस्कार, शिक्षण आणि माणुसकी हरवत चालली आहे "-डॉ. दादासाहेब कोळी*
इंदापूर: बावडा येथील श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये दि. ४ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५५ वी जयंती व लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी उच्च माध्यमिक विभागातर्फे " संस्कार शिक्षण आणि माणुसकीची आजच्या समाजाला काळाची गरज " या विषयावरती डॉ. दादासाहेब सर्जेराव कोळी यांचे उदबोधनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमासाठी श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्य लिपिक डॉ.. दादासाहेब कोळी हे प्रमुख अतिथी म्हणून होते तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापक गणेश जगताप होते.
यावेळी प्रमुख अतिथींच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
याप्रसंगी डॉ. दादासाहेब कोळी म्हणाले की, ग्रामीण भागातून संस्कार शिक्षण आणि माणुसकी हरवत चालली आहे. मोबाईलमुळे जग जवळ आले परंतु माणसं माणसापासून लांब गेली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी संस्कार, शिक्षण आणि माणुसकी जपण्यासाठी संस्काराची सुरुवात आपल्या घरापासून केली पाहिजे. संस्कारक्षम जीवन कसे जगावे तसेच शैक्षणिक जीवनात असतानाच संस्कारमूल्ये कशी अवगत करावी. समाजामध्ये घडत असणाऱ्या वाईट गोष्टीकडे दुर्लक्ष करून चांगल्या गोष्टी अवगत कराव्यात. माणसाची हरवलेली माणुसकी कशी जपावी व मोबाईल वापराचे फायदे तोटे विषद करुन विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असतानाच सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे या विषयीची अनेक उदाहरणादाखल स्पष्टीकरण देऊन विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिक्षण आणि माणुसकीची जनजागृती निर्माण करण्याचे मोठे काम ते करत आहेत.
अध्यक्षीय भाषणामध्ये . गणेश जयसिंग जगताप यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनात संस्काराचे महत्त्व व आत्मसात करावयाची ध्येय आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी काय करावे या विषयी मार्गदर्शन केले.त्याचबरोबर गणेश जयसिंग जगताप यांच्या सेवापूर्ती निमित्त ऋणनिर्देश व्यक्त करण्यात आला तसेच त्यांनी विद्यालयास वीस हजार रुपयाची पुस्तके भेट दिली. यावेळी इयत्ता बारावी मधील विद्यार्थी चि.धनराज गायकवाड याने आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख,प्रा.. सयाजी मोहिते व विज्ञान विभाग प्रमुख,प्रा..प्रकाश घोगरे, व कला विभाग प्रमुख, प्रा. . बापूराव जाधव व एम.सी.व्ही.सी. विभाग प्रमुख, प्रा.सौ. छाया घोगरे इत्यादी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.. गुजर एम. पी.सर यांनी केले व सूत्रसंचालन प्रा. सौ माने व्ही. यु. यांनी केले व आभार प्रा. सौ. देवकर ए. ए. यांनी मानले.