shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

एन. ई .एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर माध्यमिक विद्यालयातील शिक्षिका सौ अशा भैरवनाथ पर्वते यांना शिक्षक जीवन गौरव' पुरस्कार देऊन सन्मानित .

एन. ई .एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर माध्यमिक विद्यालयातील शिक्षिका सौ अशा भैरवनाथ पर्वते यांना शिक्षक जीवन गौरव' पुरस्कार देऊन सन्मानित .
इंदापूर : निमसाखर एज्युकेशन सोसायटीचे एन. ई .एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर ( ता. इंदापूर जि. पुणे) येथील माध्यमिक विद्यालयातील शिक्षिका सौ अशा भैरवनाथ पर्वते यांना एक्सलन्स सायन्स अकॅडमी बारामती यांच्यावतीने 'शिक्षक जीवन गौरव' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
 
विद्यालयामध्ये सुद्धा संस्थेचे विद्यमान सचिव धनंजय सूर्यकांत रणवरे, प्राचार्य चंद्रकांत गोपाळराव रणवरे सर पर्यवेक्षक मधुकर शंकरराव खरात सर  ज्येष्ठ शिक्षक चंद्रकांत बलभीम बोंद्रे सर यांनी व सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सौ. पर्वते मॅडम यांचे मनःपूर्वक अभिनंदन व कौतुक केले. 

मॅडमचे अध्यापनाचे कार्य संस्थेच्या विद्यालयाच्या विकासासाठी व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत अनमोल आहे. त्यांना मिळालेला हा पुरस्कार म्हणजे नक्कीच विद्यालयाचा नावलौकिक वाढवणारा आहे. आपण सर्वच शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी देखील अशा प्रकारच्या पुरस्कारासाठी पात्र आहात. विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी व तुमच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वजण चांगले कार्य करत आहात. क्रीडा क्षेत्रामध्ये देखील आपल्या विद्यालयाने इंदापूर तालुक्यांमध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये देखील एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या माणसांना पुरस्काराने सन्मानित केलेच पाहिजे. त्यांच्या चांगल्या कार्याची दखल घेतलीच पाहिजे व विद्यार्थ्यांना देखील विविध क्षेत्रात यश मिळाल्यानंतर त्यांचाही मान सन्मान केलाच पाहिजे. नक्कीच त्यांना वेगळी प्रेरणा व ऊर्जा मिळत असते व त्यातूनच खऱ्या अर्थाने समाजाची उन्नती आणि विकास होत असतो. असे मत संस्थेचे विद्यमान सचिव धनंजय सूर्यकांत रणवरे यांनी सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये व्यक्त केले. 

सौ पर्वते मॅडम यांचे कार्य खरोखरच उल्लेखनीय आहे गौरवास्पद आहे असे मत विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत गोपाळराव रणवरे सर यांनी व्यक्त केले.. 

मला मिळालेला हा पुरस्कार एकटीचा नसून सर्व विद्यार्थी ,पालक, संस्थापदाधिकारी, व सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांचा आहे. तसेच माझे आई वडिल व माझा संपूर्ण परिवार तसेच माझ्या सासरकडील सर्व मंडळी, सर्व नातेवाईक व मित्र मैत्रिणी परिवार आणि विशेष म्हणजे ज्यांचा माझ्या जीवनामध्ये व माझ्या सर्व कार्यांमध्ये नेहमीच सकारात्मक पाठिंबा , आधार व दिलासा असतो ते माझे पतीराज  भैरवनाथ पर्वते सर या सर्वांचाच पुरस्कारामध्ये  प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पणे सहभाग आहे असे मत सत्कारमूर्ती सौ. आशा पर्वते मॅडम  यांनी व्यक्त केले. 
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक आजिनाथ मलगुंडे सर व आभार प्रदर्शन प्रमोद ज्ञानदेव चव्हाण सर यांनी केले. अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत गोपाळराव रणवरे सर यांनी दिली.
close