shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

हिवरे बाजारात अवतरले चक्क मंत्रालय ; विविध विकास कामांची केली पाहणी

प्रतिनिधी : आसावरी वायकर

नगर :  महाराष्ट्र राज्य मंत्रालयातील विविध विभागाचे उपसचिव व अतिरिक्त सचिव असे एकूण ३५ सचिवांनी  आदर्श गाव हिवरे बाजार येथे दि . २ ऑक्टोबर २०२४ रोजी भेट दिली. पद्मश्री पोपटराव पवार यांनी हिवरे बाजारमधील विविध विकास कामांची सविस्तर माहिती दिली आणि सर्व विकास कामांची पाहणी केली.


त्यांनी आपल्या भेटीत मत व्यक्त करताना सांगितले कि, राष्ट्रपिता महात्मा गांधीजीनी जनतेला ‘खेड्याकडे चला’हा संदेश दिला होता.त्यांना अपेक्षित असणारे स्वयंपूर्ण खेडे ख-या अर्थाने पद्मश्री पोपटराव पवार यांनी आदर्श गाव हिवरे बाजारमध्ये साकार केले आहे.एखाद्या गावाला एक सुशिक्षित आणि व्हिजन असणारा सरपंच असेल तर गावाचा कायापालट कसा होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे हिवरे बाजार आहे.
हिवरे बाजार येथील विकास कामांचे नियोजन हे ग्रामसभेच्या माध्यमातून ठरविले जाते आणि लोकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतो आणि त्यातून दूरदर्शी अशी विविध विकासकामे होतात. पद्मश्री पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखाली हिवरे बाजार येथे १९८९ पासून शाळा,अंगणवाडी ,प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ,जलसंधारण व वनसंवर्धन कामे ,पशुधन विकास ,पिकपद्धतीत बदल त्यासाठी  ठिबक व तुषार सिंचनाचा प्रभावी वापर ,रस्ते इत्यादि कामे अतिशय उत्कृष्ट दर्जाची झालेली आहेत.

यशवंतराव चव्हाण एकात्मिक ग्रामीण विकास प्रशिक्षण केंद्र पुणे येथे दिनांक २३ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०२४ कालावधीत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता त्यात एक दिवशीय क्षेत्रीय भेट म्हणून हिवरे बाजार भेटीचे नियोजन केलेले होते.
close