प्रा.माधूरी मुंडेंच्या परिश्रमाला महिलांची तूफान साथ..!
प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी:-
केज शहरातील विक्रमराव मुंडे पोद्दार लर्न स्कुलच्या वतिने दांडिया व गरबा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.उत्सवाला विद्यार्थी व महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून प्रा.माधुरी मुंडे यांच्या परिश्रमाला तुफान साथ दिली आहे.
शहरातील विक्रमराव मुंडे पोदार लर्न स्कूलच्या वतिने दांडीया व गरबा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून सौ.कृष्णाबाई विक्रम मुंडे तर कळंबच्या माजी नगराध्यक्षा सुवर्णाताई मुंडे, गटशिक्षण अधिकारी लक्ष्मण बेडसकर,मेकअप आर्टिस्ट अनुजा सोनटक्के,मीनाक्षी कामाजी,कांचन गवळी,सरिता चाटे,आशा कामाजी,मेघा चाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी सायंकाळी ८ वाजता दांडीया व गरबा उत्सवाला सुरुवात करण्यात आली.
केज सारख्या ग्रामीण भागात महिलांना सांस्कृतिक कार्यक्रमाचे व्यासपीठ सहसा उपलब्ध होत नसल्याने विक्रमराव मुंडे लर्न स्कूलच्या वतिने महिलांसाठी गरबा तसेच दांडिया उत्सवाचे आयोजन केल्याचे प्रा.माधूरी मुंडे यांनी यावेळी सांगितले.कार्यक्रमाला महिला व विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदवला होता.यावेळी विजेत्या महिलांचा व विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देउन गौरव करण्यात आला.यावेळी संस्थेचे अध्यक्ष विजयकांत मुंडे,संस्थेचे सचिव अतुल मुंडे,प्रा.सौ.माधुरीताई मुंडे, रुपालीताई मुंडे ,शाळेच्या प्राचार्या अभिलाषा मॅडम, उपप्राचार्य राहुल पवार सर, अतुल दादा मुंडे यांनी उपस्थितांचा यथोचित सन्मान केला.कार्यक्रमाचे उत्कृष्ठ सुञसंचन सुमय्या मॅडम,मोरे मॅडम यांनी केले.यावेळी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचार्यांसह महिला व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
पारंपरिक वेशभूषा खास आकर्षण
दांडिया उत्सवात पारंपरिक वेशभूषा खास आकर्षण ठरली.यात जोगवा मागणारी स्त्री,भगवाधारी साधू,भूपाळी, गाठोड डोक्यावर घेवून निघालेली चिमुकल्याची आई,राज महालातील स्त्री, गुढी खांद्यावर घेतलेला तरुण, रामशास्त्री प्रभुणे आदी वेशभूषा लक्षवेधी ठरल्या.