shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन प्रा.ईश्वर मुंडे यांनी दिली पक्षाकडे मुलाखत !!

 

 प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी :-

  सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात खा.शरदचंद्र पवार हे बीग बॅास च्या भूमिकेत दिसत आहेत. राष्ट्रवादी कॅांग्रेस शरदचंद्र पक्षात अनेकांचे इन कमिंग होत आहेत कांही जन रांगेत उभे आहेत.




   राष्ट्रवादी कॅांग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे ज्या ईच्छूक उमेदवारांनी अधिकृत पक्षाचे सदस्यत्व फीस व नाममात्र पक्ष निधी जमा केलेला आहे अशा इच्छूक उमेदवीरांच्या मुलाखती मार्केट यार्ड पुणे येथील निसर्ग कार्यालयात दि.५ ॲाक्टोबर २०२४ शनिवारी घेण्यात आल्या.

     या मुलाखतीसाठी दस्तूर खुद खा.शरदचंद्र पवार,खा.फौजिया खान,खा.वंदना चव्हाण,आ.राजेश टोपे,खा.बजरंग बप्पा सोनवणे,आ.रोहीत पवार,महेबुब शेख,राज राजापूरकर,हिरालाल राठोड,डॅा.नरेंद्र काळे यांचे सह पार्लमेंट्री बोर्ड चे सदस्य उपस्थीत होते.

      सर्वच इच्छूक उमेदवार पक्षाकडे मुलाखती देत आसतात परंतू प्रा. ईश्वर मुंडे यांची मुलाखत ही वैशिष्टय पूर्ण झाली. याचे कारण म्हणजे हिमालयाच्या मदतीला धावलेले सह्याद्री,पुरोगामी विचारांचा वसा व वारसा चालवणारे,खा.शरदचंद्र पवार यांचे श्रध्दास्थान,महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या प्रिती संगम (कृष्णा - कोयना) कराड जि. सातारा येथील समाधीचे दर्शन घेऊन,आशिर्वाद घेऊन मुलाखत दिली.

        आपली पक्ष निष्ठा व खा.शरदचंद्र पवार यांच्या सोशल इंजिनिअरींच्या राजकीय खेळीमुळे आपल्यालाच उमेदवारी मिळेल या आत्मविश्वासाने प्रा.ईश्वर मुंडे यांनी मतदार संघात जन संपर्क वाढवला आहे.

          उच्च शिक्षीत,स्वच्छ प्रतिमा व सर्व समावेशक चेहरा या मुळे प्रा.ईश्वर आनंदराव मुंडे यांना माजलगाव मतदार संघातील मतदारांकडून पसंती मिळत आहे.

close