shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

तुच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार....


याच्या त्याच्या भरोशावर शेवटी 
कुठवर तु अवलंबून राहणार ?

उठ मानवा जागा हो,तुच आहे 
तुझ्या जीवनाचा शिल्पकार !!

स्वतः चा संघर्ष,स्वतः चाच फायदा !
नको कोणावर उसनवारीचा वायदा !!

जोपर्यंत फायदा तोपर्यंत राबवून घेणार !
तुझी गरज संपताच तुला सोडून देणार !!

*माझ्या बोलण्यावर कर आताच विचार !*
*तुच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार...*

कुठवर दुसऱ्यालाच तु कमवून देणार ?
अन् स्वतःसाठी निर्णय तरी कधी घेणार?

स्वतः सक्षम हो, इतरांना सक्षम बनवं !
ते ही दोन पैसे कमावतील तु ही कमवं !!

ते ही मान, मर्यादा, प्रतिष्ठा कमवतील,
तु देखील मान,मर्यादा,प्रतिष्ठा कमवं !!

स्वतः मोठा हो दुसऱ्यांनाही मोठे कर !
मार्ग तुझ्या प्रगतीचा आजच तु धर !!

*यापुढे राहु नकोस कोणाचा वेठबिगार !*
*तुच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार..*

सदैव त्याच्याशी तु इमानदारीनेच वागला !
अन् स्वतःला कामांत वाहून घेवू लागला !!

दिवसंरात्र नेहमी तु दुसऱ्यांसाठी राबला !
मात्र त्याने तुझ्या प्रगतीचा मार्ग दाबला !!

मनुष्य असूनही नाही तो तसा वागला !
सारखं नेहमी पैसापैसाच करु लागला !!

खुप झाले आता शेवटी कुठवर मागे राहतो !
चल उठं प्रगतीचा मार्ग तुझीच वाट पाहतो !!

तुझे परिश्रम आज सार्थकच ठरणार !
तुच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार..
-------------------------------------------------

शब्दांकन: शौकतभाई शेख
श्रीरामपूर - 9561174111

संस्थापक / अध्यक्ष
स्वाभिमानी संपादक सेवा संघ

🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟

close