shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

अमित कमलाकर जोशी याची UGC NET मध्ये यशस्वी उत्तुंग भरारी ...


99.93 % गुण मिळवत यशाला गवसणी

 प्रतिनिधी : संजय वायकर

करमाळा तालुक्यातील मुळ रहिवाशी कमलाकर गजानन जोशी लातूर येथील श्री केशवराज मंदिर येथील पुजारी असुन यांचा मुलगा अमित कमलाकर जोशी हा UGC NET 2024 मध्ये 99.93 गुण मिळवून *NET with JRF* Commerce विषयात उत्तीर्ण झाला. त्याने मिळविलेले हे खुप मोठे यश आहे .

 
भारतात या वर्षी Commerce विषयात फक्त 109 विद्यार्थी JRF झाले आहेत . त्यात अमित हा अतिउत्तम गुणाने उत्तीर्ण झाला आहे .

अमितच्या या यशाचे श्रेय तो त्याचे गुरु , आईवडिल आणि शिक्षक , मित्र यांना असल्याचे आवर्जुन सांगतो .

राजकिय, सामाजिक सर्व स्तरातून अमितचे कौतुक होत असुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे . अनेकांनी त्याला पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत .
close