प्रतिनिधी- एरंडोल पारोळा भडगांव विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार भगवान महाजन यांच्या प्रचाराचा नारळ मंगळवारी दि. ५ नोव्हेंबर रोजी श्री क्षेत्र पद्मालय येथे मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडण्यात आला. श्री क्षेत्र पद्मालय येथे गणपती बाप्पा यांच्या चरणी लीन होऊन भगवान महाजन यांनी प्रचाराची सुरुवात केली.
आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की, जनतेला परिवर्तन घडवून आणायचे असून एरंडोल पारोळा भडगाव तालुक्यातील मतदारांच्या आशिर्वादाने मला नक्कीच विजय मिळेल. हि लढाई जनशक्ति विरुद्ध जनशक्ति ची असून विकास झाला नसल्याने विकासाच्या नावावर निवडून येणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. तसेच जनतेच्या मनात कोणाला राजा बनवायचे हे जनता ठरवेल.