भाजप महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ.नमिता अक्षय मुंदडा यांच्या प्रचारार्थ मंगळवारी अंबेजोगाई येथे मंगळवार दिनांक 12 नोव्हेंबरला सकाळी 11=30 वाजता श्री शंकर महाराज वंजारी विद्यार्थी वसतिगृह येथे देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाचे मंत्री ना. नितीन गडकरी , भाजपा राष्ट्रीय सचिव, लोकनेत्या आ.पंकजा मुंडे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती केज भाजपा महायुतीच्या वतीने देण्यात आली आहे.
केज विधानसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक 2024 निमित्त भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ नमिता अक्षय मुंदडा यांच्या प्रचारार्थ ही सभा होणार आहे. तरी या सभेसाठी भाजपा , शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट,रिपाई रामदास आठवले गट आणि महायुतीच्या घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे अशी विनंती व आवाहन जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, युवा नेते अक्षय मुंदडा व केज विधानसभा मतदारसंघ भाजपा महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.