shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

वडाळा महादेव शिवारातील कार अपघातात एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

दोघे ही भोकर येथील सख्खे चुलत भाऊ, अवघ्या ७ कि.मी वर घर आले होते

श्रीरामपूर / प्रतिनिधी 
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथून बहीणीला नाशिक येथे पोहचविण्यासाठी गेलेल्या भोकर येथील दोघा भावांच्या कारला वडाळा महादेव शिवारात मध्यरात्री झालेल्या भिषण कार अपघातात सागर खेत्री या तरूणाचा मृत्यू झाला तर आकाश खेत्री हा गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना घडली असून मयतावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले तर गंभीर जखमीवर लोणी येथील प्रवरा मेडीकल येथे उपचार सुरू आहेत. घर अवघे सात कि.मी. वर असतानाच काळाने घाला घातला.

भोकर येथे वेल्डींग व्यावसाय करणारे बाबासाहेब खेत्री यांचा मुलगा आकाश बाबासाहेब खेत्री (वय-२८) हा आपला सख्खा चुलत भाऊ सागर लक्ष्मण खेत्री (वय-२८) हे दोघे दिवाळीच्या भाऊबीज सणासाठी आलेल्या बहिणीला वाहन क्र. एम एच १४ एल बी ५८५४ हीने नाशिक येथे पोहचविण्यासाठी गेले होते. तेथे आपल्या बहीणीला पोहच करून घरी भोकर येथे परत येत असताना सोमवार दि.११ नोव्हेबरच्या रात्री अकरा वाजेच्या सुमारास श्रीरामपूरहुन श्रीरामपूर- नेवासा राज्य मार्ग क्र.५० ने भोकर येथे येत असताना वडाळामहादेव शिवारातील पवार याच्या शेतालगत त्याच्या कारला झालेल्या भिषण अपघातात येथील सागर लक्ष्मण खेत्री या तरूणाच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला तर कार चालक असलेला आकाश खेत्री याच्या कमरेला, मानेला व डोक्याला जबरी मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 

या कार अपघाताचे ठिकाण त्यांच्या घरापासून अवघ्या सात कि.मी वर राहीले होते, काही मिनीटात हे दोघे भाऊ आपआपल्या घरी पोहचणार होते परंतू दुर्दैवाने काही मिनीट अगोदर काळाने घाला घातला अन् अपघात झाला व एकुलता एक सागर या अपघातात मयत झाला. मध्यरात्री अपघात होवून ही गंभीर जखमीस वेळेत मदत मिळाल्याने आकाश बचावल्याची परीसरात चर्चा सुरू होती.
वडाळा महादेव शिवारात राज्यमार्गालगतच्या झाडांना तोडून दुसर्‍या झाडात ही कार गुंतलेली होती. हा अपघात कशामुळे व कसा झाला हे उशीरापर्यंत समजू शकले नाही. अपघात घडल्याचे समजताच वडाळा महादेव येथील पवार कुटूंबाने लागलीच भोकर येथे त्यांच्या कुटूंबियांना अपघाताचे वृत्त कळवत गंभीर जखमीस तातडीने श्रीरामपूर येथील साखर कामगार हॉस्पीटल येथे उपचाराकरीता रवाना केले, तेथून त्यास लोणी येथील प्रवरा मेडीकल ट्रस्टच्या हॉस्पीटलमध्ये दाखल केले तेथून त्यास नाशिक जिल्ह्यातील एस एम बी टी हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल केले तर मयत सागर खेत्री याचे शवविच्छेदनानंतर त्याचे वर भोकर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.  
मयत सागर हा गं.भा.बेबी लक्ष्मण खेत्री यांचा एकुलता एक मुलगा होता, त्याचा गेल्या सहा महिण्यापुर्वीच विवाह झालेला होता, त्याच्या या अपघाती निधनाने परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याचे पश्चात पत्नी, आई, आजी, आजोबा, दोन चुलते व चुलती असा परीवार आहे. या प्रकरणी शहर पोलीसांत अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.नि.नितीन देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.काँ. संतोष परदेशी हे पुढील तपास करत आहेत.

*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार चंद्रकांत झुरंगे - भोकर
*संकलन*
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर -9561174111
close