*प्राजक्त तनपुरे यांचा विजय हा निश्चित - सुरेशराव लांबे पाटील
प्रतिनिधी जावेद शेख / राहूरी
राहुरी - विधानसभा निवडणुकीत शेतकरी व सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी कार्यकर्ते नातेवाईक मित्र मंडळाच्या आग्रहा खातर महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्ता तनपुरे यांना पाठिंबा दिला.लांबे यांनी आपल्या भाषणात बोलताना प्राजक्ता तनपुरेंचे विजय निश्चित. तनपुरेंचे व माझे वैयक्तिक मतभेद नसून आमचे मतभेद हे सामाजिक प्रश्नावरून झाले असले तरी आज हे सर्व विसरून मतदार संघातील बहुजन समाजातील शेतकरी व सर्व सामान्य मतदारांच्या हितासाठी प्रलंबित प्रश्न सोडवण्याच्या अटीवर प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन जाहीर पाठिंबा देण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक काशिनाथ नाना दोंड हे होते. लांबे यांनी मेळाव्यात आपल्या मनोगतात तालुक्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आग्रह केला. यावेळी राहुरी येथील आत्मा मालिक हॉल यश मध्ये पाचशे प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश होता.
यावेळी सुरेशराव लांबे यांच्याकडून २२ मागण्याचे लेखी निवेदन हर्ष तनपुरे, चाचा तनपुरे, एकनाथ तनपुरे
यांच्याकडे देण्यात आले.
हर्ष तनपुरे व चाचा तनपुरे यांनी यावेळी भाषणात लांबे यांनी केलेल्या मागण्या जनहिताच्या असल्या कारणाने त्या मार्गी लागतील याची ग्वाही दिली.
मागण्या पुढील प्रमाणे- राहुरीत सुसज्ज ग्रामीण रुग्णालय इमारत.
शेतकरी व शेतमजुरांच्या मुलांना प्राथमिक विविध उच्च शिक्षण मोफत मिळावे. ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे लाईट बिल एच.पी. प्रमाणे आकारणी व्हावी.
तालुक्यातील बंद पडलेल्या सर्व संस्था सुरळीत चालू करून शेतकरी,कामगारांना न्याय देऊन त्यांचे थकित पगार ग्रॅज्युटी फंड मिळवून द्यावेत,सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या नोकरीसाठी एमआयडीसी नवीन उद्योग आणावेत, मुळा धरण व कृषी विद्यापीठ प्रकल्पग्रस्तांना हक्काची नोकरी मिळवून द्यावी,
तालुक्यातील सर्व गावातील मुख्य व वाडी वस्तीसह शेतात जाण्यासाठी रस्ते करावे,ऊसाला किमान ४ हजार रु.प्रती टन, कांदा ३ हजार,कापूस १० हजार, सोयाबीन १० हजार प्रती क्विंटल.व इतर शेतीमालाला हमीभाव मिळावा,दुधाला कायमस्वरूपी किमान ५० रुपये प्रति लिटर भाव मिळावा, डिझेल, पेट्रोल रासायनिक खते,कृषी औषधे,पशुखाद्य याचे भाव नियंत्रण आणावेत,
शेती पंपाला दिवसा अखंड बारा तास मोफत वीज मिळावी व थकीत बिले खात्रीशीर माफ करावेत,
शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी करावी, नागरिकांना ग्रामपंचायत किंवा नगरपालिका हद्दीतील भोगाटदार जागा स्व मालकीच्या करुन त्यांना घरकुलासाठी परवानगी मिळावी,घरकुलासाठी ५ लाख रुपये मंजूर करणे,
पिंपरी अवघड गावासह इतर गावांना गावठाण वाढीसाठी शासकीय जमीन उपलब्ध करून द्यावी,संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग व सर्व निराधार व्यक्तींना किमान ६ हजार महिना मिळावा, शेतीसाठी किमान प्रति एकरी एक लाख बिगर व्याजी कर्ज मिळावे,
आमदारांचे मानधन कमी करावे व माजी आमदारांची पेन्शन बंद करावी किंवा सरपंच व सरकारी,निम सरकारी कामगारांना पेन्शन चालू करावी,मुळा व भंडारदरा आणी निळवंडे धरणाच्या पाण्याचे योग्य नियोजन करून तालुक्यातील शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळावा,६० वर्षे वरील शेतकरी व शेतमजूर यांना किमान ६ हजार रुपये मानधन मिळावे,सर्व समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आर्थिक निकषावर आरक्षण मिळावे अशा बावीस मागण्यांचे लेखी निवेदन श्री. लांबे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांना पाठिंबा देताना दिले.
यावेळी बहुजन सामाजिक विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा शेतकरी नेते सुरेशराव लांबे पाटील, पोपटराव जाधव,खुळे मामा,बाळासाहेब म्हसे,
प्रल्हाद काळे,सुनील भाऊ मोरे,माजी चेअरमन भास्कर नाना लांबे,मार्केट कमिटीचे संचालक बापूसाहेब बाचकर,पिंपरी अवघडचे चेअरमन मच्छिंद्र लांबे, व्हाई. चेअरमन रवींद्र पवार,प्रसाद गायकवाड, सरपंच लहान भाऊ तमनर, राजेंद्र लांबे, दत्तात्रय कोकाटे,गणेश लांबे,सुनील काचोळे,शिरसाट पाटील, बादशहा साईनाथ दोंड, गोटीराम लांबे,गणूभाऊ गटकळ,अनिल धसाळ, दादासाहेब कोकाटे,युनुस शेख,भारत जगधने,दत्तात्रय पटारे, अंतवन गायकवाड, राजेंद्र वाघमारे,बाबासाहेब लांबे, मनोज गायकवाड, जयहिंद लांबे, अनिकेत लांबे, प्रमोद लांबे व इतर अनेक नातेवाईक.मित्र मंडळ,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*संकलन*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - ९५६११७४१११