shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

अय्युब पठाण यांची " पाणपोई "कविता अभ्यासक्रमात


पैठण / प्रतिनिधी:
बालपणापासून मोठ्या संघर्षावर मात करीत आलेले तथा बँन्डमास्टरचे शाळामास्तर झालेले अय्युब पठाण लोहगावकर (ता. पैठण) यांची बालभारतीच्या निवड समितीने जून २०१६ पासून इयत्ता सहावीच्या इंग्रजी- हिंदी- एसबीएसई, आणि सीबीएससी. या चारही माध्यमाला " पाणपोई" या कवितेचे संपूर्ण महाराष्ट्रातील वरील सर्व माध्यमांच्या शाळेत इयत्ता सहावीच्या अभ्यासक्रमात या कवितेचा समावेश केलेला आहे. तसेच  " पाणपोई " कवितेचे युट्यूब चॅनलवर ७२ व्हिडीओंचा ऑनलाईन पद्धतीने " पाणपोई" कवितेचे महाराष्ट्रातील विविध शाळेतील शिक्षक - शिक्षिकेने  पाणपोईवर प्रभावी अध्यापन केलेले आहे.

 मराठवाड्यातील एका बँन्डमास्टरने लिहीलेली               " पाणपोई " या कवितेची बालभारतीच्या निवड समितीने  खरोखरच एका दुर्लक्षित कवीच्या रचनेची दखल घेऊन बालभारतीने इतिहास घडविला आहे. कवी तथा लेखक अय्युब पठाण लोहगावकर यांची १२ पुस्तके (आठ बाल कवितासंग्रह व चार कथासंग्रह ) हे प्रकाशित असून त्यांच्या साहित्याला विविध सेवाभावी संस्था व संघटनांचे ३० राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहे.

*संकलन
समता मीडिया सर्व्हिसेस 
श्रीरामपूर - 9561174111
close