श्रीरामपूर [ प्रतिनिधी ]
काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हेमंत ओगले यांना श्रीरामपूर येथे वंचित कडून इच्छुक असलेले सुहास राठोड यांनी पक्षातील उमेदवार मान्य नसल्यानें हेमंत ओगले यांना पाठिंबा दिला परंतु काँग्रेसकडून कुठलीही निवडणूक प्रक्रियेमध्ये कार्यकर्त्यांना कोणालाही विचारात न घेतल्यामुळे कार्यकर्त्यांचा सन्मान होत नसल्यामुळे त्याचबरोबर कुणाचाही विचार होत नसल्यामुळे वंचित चे हितचिंतक सभासद सुहास भाऊ राठोड मिञ मंडळ तसेच भीमराज प्रतिष्ठाण चे असंख्य कार्यकर्ते यांनी पाठींबा काढून घेऊन पुन्हा दोन दिवसात आमच्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना विचारात घेतल्या जाईल त्याच्यासोबतच आम्ही आमची राजकीय भूमिका ठरवणार आहोत केवळ कामापुरता वापर कार्यकर्त्यांचा होणार असेल तर हे आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी समाजातल्या घटकांसाठी हिताचे नसून येणारा काळ आमच्यासाठी त्रासदायक असणार आहे या भावनेने सर्व कार्यकर्त्यांनी दिलेला पाठिंबा काढून घेण्याचा ठरवलेला आहे.
जे आज विचारत नाहीत ते उद्या विचारतील असे देखील आम्हाला वाटत नाही असं कार्यकर्त्यांचं सर्वांचे म्हणणे असल्यामुळे आम्ही दिलेला पाठिंबा काढून घेत आहोत आणि दोन दिवसात सक्षम पर्याय म्हणून जो सर्वांचे विचार असेल त्याच्यासोबत काम करणार असून आम्हाला मानणारा जो दहा-पंधरा हजाराचा मतदार असेल तो निश्चित त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मदत करणार असल्याचे सुहास राठोड म्हणाले, तसेच मित्रमंडळासह निर्णय घेण्यात आला असुन लवकर पुढील उमेदवाराला जाहीर पाठिंबा देणार असल्याचे स्पष्ट धोरण तयार केले आहे.
सामाजिक कार्यकर्ता
श्रीरामपूर