दिपावली पाडव्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित रहा...
- रमेशराव आडसकर !
प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी*:-
केज तालुका म्हटले की स्व.बाबुरावजी आडसकर व त्यांचा "हाबाडा" हे शब्द आठवतात.दुसरी एक महत्वाची आठवण म्हणजे दिपावलीच्या पाडव्याची आठवण.संपुर्ण केज,अंबाजोगाई व धारुर परिसरातील सर्वच स्तरातील राजकीय ,सामाजिक ,शैक्षणिक व पञकारीता या क्षेञातील लोक या दिवशी आडसला येवुन आडसकर साहेबांच्या शुभेच्छा घेत असत. एवढेच नव्हे तर गांवा गांवातील शेतकरी,शेतमजुर हे सुद्धा एकाच पंक्तीला बसुन फराळ करत असत.दिवाळी आणि आडसकर साहेबांचा दिपावली पाडव्याचा मुक्त दरबार हे समीकरणच झाले. तालुक्याच्या नकाशातील एक छोटेसे गांव म्हणजे आडस.या गांवाला संपुर्ण महाराष्ट्रात एक वेगळी ओळख माजी आमदार स्व.बाबुराव आडसकर यांनी मिळवुन दिली .
1964 मध्ये केज पंचायत समितीचे सभापती म्हणुन काम करतांना ग्रामिण प्रश्नांची खरी नस त्यांना सापडली होती.1960 च्या दशकात दळणवळणाची सोय नाही.वृतपञाचा बोलबाला नाही.दुरसंचार माध्यमातुन फोनची सुविधा अपुरीच होती.अशा काळात संपुर्ण केज अंबाजोगाई परिसर साहेबांनी सायकलवरुन पिंजुन काढलाहे विशेष होय.खेडोपाडी आडसकरांनी आपला रुणानुबंध निर्माण केला.
कुठलाही कार्यकर्ता असो त्याला त्याचे प्रश्न विचारुन त्याला सन्मानाने व समाधानाने ते काम करुनच परत पाठवत असत.त्यांच्या या माणसे जोडण्याच्या स्वभावामुळे व काम करण्याच्या धडाडीमुळे प्रत्येक गांवात त्यांच्या कामाचा ठसा निर्माण होत असे.त्याचे बोलके उदाहरण म्हणजे 1972 ची केज विधान सभेची निवडणुक होय.केजच्या सर्वसाधारण मतदार संघातुन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कडून आडसकरांना उमेदवारी मिळाली होती.तर त्यांच्या विरोधात महाराष्ट्रातील प्रसिध्द विचारवंत कै.बापुसाहेब काळदाते यांना उमेदवारी प्रजा समाजवादी पक्षाने दिली.या लढतीकडे महाराष्ट्राचेच नव्हे तरl भारत देशाचे लक्ष या लढतीकडे होते.अनेक राजकीय विचारवंत व पञकारांचे अंदाज खोटे ठरवत या मध्ये आडसकर साहेबांनी 38416 मते घेवुन समाजवादी नेते काळदाते यांचा पराभव केला होता.अगदी देशाच्या संसदेतही काळदातेंना पाडणारा माणुस कोण आहे हा प्रश्न पडला होता. केज ची ही निवडणुक मराठवाड्याच्या राजकीय इतिहासात महत्वपुर्ण ठरली याचे कारण म्हणजे बाबुराव आडसकर साहेबांवर प्रेम करणारी ग्रामिण जनता होय.त्यांनी दिलेला *हाबाडा* हा शब्द कुठल्याही इलेक्शन मध्ये चर्चिला जातो.हा त्यांच्या बोली भाषेतला शब्द राजकारणात खुपच रुढ झाला.
कडक टोपी,भारदार मिश्या ,पांढराशुभ्र सदरा ,धोती व या बरोबरच जॕकेट घालुन वाड्यावर बसलेले साहेब ...त्यांच्या शेजारी एक टेली फोन ,पान सुपारीचे तबक ,व समोर बसलेले पंचक्रोशीतील शेतकरी व शेतमजुर...! प्रश्न ऐकुन त्याच ठिकाणी तहसील ,एमइसिबी ,पंचायत समिती मधील अधिकाऱ्यांना फोन करुन प्रश्नांची सोडवणुक करत.चहा घेतल्याशिवाय कोणीही जाणार नाही याची ते काळजी घेत असत.म्हणुनच तर ते जनतेच्या मनात घर करुन राहिले होते.
अनेकांची घर संसारे त्यांनी अंबाजोगाइ सहकारी कारखान्याच्या माध्यमातुन फुलविली होती.त्याच बरोबर कृषी उत्पन्न बाजार समिती ,श्री.छञपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातुन भुमी पुञांना न्याय देण्याचे काम केले.केज तालुक्यात प्राथमिक ते माध्यमिक शिक्षणाची मुहुर्त मेढ रोवली. बालाघाटाच्या डोंगर रांगातील चोंढी ते देवळा व धारुर ,केज व अंबाजोगाई तालुक्यातील अनेक गावांत माध्यमिक विद्यालये सुरु केली. उच्च शिक्षणासाठी ही ते आग्रही असल्यामुळे 1990 ला वसंत वरिष्ठ महाविद्यालय ( सध्याचे बाबुरावजी आडसकर वरिष्ठ महाविद्यालय ) केज व छ.शिवाजी वरिष्ठ महाविद्यालय आडस हे शैक्षणिक संकुल निर्माण केले. वसंत कनिष्ठ व छ.शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयातुनही अनेक विद्यार्थी वैद्यकीय व अभियांञिकी शिक्षणासाठी प्राप्त झाले आहेत.
त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मा.रमेशराव आडसकर यांनी केज ,धारुर व कळंब येथे सीबीएसई चे शारदा इंग्लीश स्कुल व वसंत पाॕलिटेक्निक व वसंत फार्मसी कॉलेजची सुरूवात केली.
दि.12 आगस्टला 2016 ला काळाने घाला घातला.हा दिवस मराठवाड्याच्या राजकीय व शैक्षणिक क्षेञासाठी दुःखाची वेदना घेवुन आला. केज ,अंबाजोगाई व धारुर तालुक्याच्या राजकारणात ग्रामिण भागातील शेतकरी व शेतमजुर यांचे प्रश्न घेवुन लढणारे माजी आमदार बाबुराव आडसकर यांचे दुःखद निधन झाले .
बंधुअॕड. मेघराज आडसकर व तात्यांच्या निधनानंतर एकाकी रमेशराव आडसकर खचले नाहीत .कौटुंबिक धक्क्यानंतर ही ते सावरले. माजलगांव मतदार संघातुन झालेला निसटता पराभव येणाऱ्या काळात निश्चितपणे यश खेचुन आणल्याशिवाय राहणार नाही. पराभव झाल्यानंतर ही ते माजलगावच्या कुरुक्षेत्रावरून परतले नाहीत...! संयमाने प्रत्येक माणसाच्या सुख नि दुःखात ते सहभागी झाले. तरुणाला ही लाजवेल असा 21 किलोमिटरचा पायी प्रवास मराठा समाजाच्या आरक्षणासाठी केला हे विशेष होय..! बीड जिल्ह्यातील आंतरवाली सराटीला जाणारे रमेशराव आडसकर आरक्षणाच्या लढाईचे पहिले नेते ठरले. कोव्हिड काळातील केलेली कामे व सर्व शिक्षण संस्था कोव्हिड केंद्रासाठी उपलब्ध करून दिल्या.
तात्यांच्या मार्गावर चालत रमेशरावांनीही या प्रवासात लाखो माणसे जोडली आहेत. माजी आमदार कै.बाबुरावजी आडसकर साहेबांचा दिवाळी सदिच्छा भेट हा कार्यक्रम रमेशराव आडसकर तितक्याच उत्साहाने पुढे नेत आहेत.दिपावली पाडव्याला ते केज, अंबाजोगाई व माजलगावच्या परिसरातील जनतेला दि.02/11/24 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत फराळासाठी आडसच्या निवासस्थानी उपस्थित राहण्याचे आवाहन रमेशराव आडसकर यांनी केले आहे.