shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

वादळ माणसाळतय...

      माझे सामाजिक कामाचे आदर्श मुरलीधर देवदास आमटे उर्फ बाबा आमटे.. ह्यांचे जीवना वरचे नाटक मी १९८८ साली पाहिले होते.. नाटकाचे नाव होते वादळ माणसाळतंय..

ह्या नाटकात एक मोठा प्रसंग आहे.. बाबा आमटे हे नगराध्यक्ष असतात.. त्या काळात मेहतर समाज संडास चे मैला भरलेले डबे डोक्यावर घेऊन गावाचे बाहेर नेऊन टाकत.. पावसाळ्यात ह्या समाजाचे कामगारांचे प्रचंड हाल होत होते.

विद्यार्थी दशेत बाबा आमटेंनी मेहतर समाजासाठी सत्याग्रह केला होता.. त्यामुळे नगरपालिका चे कर्मचारी यांनी नगराध्यक्ष आमटे यांना समस्या जाणून घेऊन पगार वाढीची मागणी केली..
     बाबा आमटे यांनी दुसऱ्या दिवसापासून मेहतर समाजा सोबत डोक्यावर मैला वाहण्यास सुरुवात केली.. त्यांच्या समस्या जाणल्या व नंतर पगार वाढ केली.. हे खरे वादळ..
त्यांचा हाच आदर्श घेत मी निवडणूक लढवली.. राजकीय मैला माझे डोक्यावर मी वाहिला.. निवडणूकीतील विष्ठा मी पाहिली, मी अनुभवली, त्याची दुर्गंधी माझ्या अंगावर घेतली.. मला खरच नुभव घ्यायचा होता मी घेतला..
       मतदार मला मतदान करतील, मला डोक्यावर घेतील, माझे विचार ऐकतील, मला साथ देतील, मला त्यांचा नेता म्हणून स्विकारतील याची अपेक्षा मला कधीच नव्हती.. पण मी माझ्या आमदाराचे पात्रात प्रचारा दरम्यान माझे सर्वस्व देत होतो.. केवळ ह्या निवडणूकीच्या शौचालय मैल्याचे प्रश्न जाणून घेण्यासाठीच..

मी आमदार होणार नव्हतो, मला व्हायचे नव्हते, पण झपाटलेल्या समाज सुधारकाला ह्या दिव्यातून जावे लागले.. आणि मी आनंदाने हे दिव्य पार केले.. माझ्या कुटुंबातील सदस्यांना देखील हे ज्ञात नव्हते.. त्यांनी माझ्या ह्या दिव्यात मला तन, मन, धनाने साथ दिली.. त्यांचे मी आभार मानतो व माफी मागतो..
*तसेच ज्या मतदारांनी मतदान दिले त्यांचे आभार.. ज्यांनी नाकारले त्यांचे देखील आभार.. मला ह्या भ्रष्ट झालेल्या लोकशाही च्या मंदिरात पाठवले नाही*

मी माझा अहवाल दिल्लीला निवडणूक आयोगाला पाठवणार आहे लवकरच..!


संजय बबुताई भास्करराव काळे
close