shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

राष्ट्रवादीच्या अहमदनगर शहर जिल्हाध्यक्षपदी अल्तमश जरीवाला यांची निवड


नगर / प्रतिनिधी:
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष अल्पसंख्यांक विभागाच्या अहमदनगर शहर जिल्हाध्यक्षपदी अल्तमश जरीवाला यांची निवड प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब यांनी केली आहे. 

श्री.जरीवाला यांचा पक्ष बांधणी मध्ये महत्वाचा वाटा आहे. सदर कामाची पावती म्हणून शहर जिल्हा अध्यक्ष अभिषेक कळमकर व जिल्हा अध्यक्ष अतहर खान यांनी श्री.जरीवाला यांच्या निवडीसाठी पक्षाकडे पाठपुरावा केला होता. सदर निवडीत खा. निलेश लंके यांनी सकारात्मक भूमिका घेत निवडी साठी सकारात्मक प्रतिसाद दिला.अल्तमश जरीवाला यांनी समाजातील विविध प्रश्नांसाठी खास करून पीरशाह खुंट भागात त्यांनी पाण्याचे, रस्त्याचे,ड्रेनेज लाईनच्या कामासंदर्भात नेहमीच अग्रेसिव भूमिका घेत प्रशासनाकडे धरणे आंदोलन करून समस्यांचे निवारण केले आहे तसेच इतर ठिकाणी सर्व समाजाच्या सामाजिक प्रश्नांसाठी नेहमी पुढाकार घेत ते सोडविण्यासाठी पाठपुरावा केलेला आहे. सदर निवडीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके,माजी आमदार दादाभाऊ कळमकर, अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष अथर खान, उपाध्यक्ष समीर पठाण, युवक अध्यक्ष रोहन शेलार, शहर उपाध्यक्ष बाबू कुरेशी, भाऊ खंडागळे, नूर कुरेशी, सोहेल खान,असीर शेख आदींनी स्वागत केले.

*वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान, अहमदनगर 
*संकलन
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
close