शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन )
राजकीय बातमी
शिर्डी मध्ये ना.मा.श्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे प्रचारात महिला आघाडी शिवसेनेच्या सह संपर्कप्रमुख सौ अनिताताई जगताप यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी आघाडी घेतली.
शिर्डीच्या माजी नगराध्यक्षा व शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेना पक्षाच्या संपर्क प्रमुख सौ अनिताताई जगताप व परिसरातील महिला यांनी मा ना श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रचारात आघाडी घेतली आहे. मा.मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या आदेशानुसार शिर्डीतील महायुतीचे सर्व घटक पक्षासोबत शिवसेनेने मोठ्या प्रमाणात सुरू केला आहे. घरोघरी जाऊन सर्व महिला व पुरुष मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देणे , मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांनी व महायुतीचे सरकारने जनतेसाठी दिलेल्या सर्व योजनांची अंमलबजावणी किती सुनियोजित पद्धतीने सुरू आहे याची माहिती देणे,यासर्व योजना आपल्या पर्यंत ना राधाकृष्ण विखे पाटील कशा घेऊन येतात या संबंधात मतदारांशी थेट संपर्क साधून चर्चा केली जाते. मा. ना. राधाकृष्ण विखे पाटलांना का निवडून द्यावे तर शिर्डी मतदारसंघात झालेला विकास , मिळालेल्या योजना व सुविधा यामुळे शिर्डी मतदारसंघाला विखे साहेबांसारखेच आमदार पाहिजे असे मतदारांना पाठविले जाते . सौ जगताप यांचा तळागाळातील नागरिकांशी तसेच शेवटच्या घटकांपर्यंत संपर्क असल्याने त्या नामदार साहेबांनाच मतदान करावे हे पटवून देत आहेत. लाडकी बहीण योजना , महिलांसाठी 50 टक्क्यांनी प्रवास सवलत, बेरोजगार भत्ता, वैद्यकीय उपचार,उज्ज्वला गॅस योजना,घर तेथे शौचालय,बचत गट अशा एक ना अनेक योजनांची माहिती मतदारांना विस्तृतपणे देऊन ना विखे पाटलांना निवडून देण्याचे आवाहन करीत आहेत.
ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपले शिर्डी गाव व मतदार संघातील परिसरासाठी विविध योजना आणून कसा विकास केला आहे हे पटवून देत आहेत.
नगराध्यक्ष पदाचा अनुभव असल्याने ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व साहेबांच्या प्रयत्नाने शिर्डी शहराचा कसा विकास केला हे सांगितले जाते. रस्ते, पथदिवे , 100 टक्के भूमिगत गटार, घर तेथे नळ, कचरा नियोजन, साथीचे आजार व त्यावरील उपाय, औषधांची फवारणी, स्वच्छ शिर्डी हरित शिर्डी व सुंदर शिर्डी , यासर्व बाबी पूर्ण करून शिर्डी करांचे स्वप्न साहेबांनी पूर्ण केल्याची ग्वाही सौ जगताप देत आहेत.महायुतीचे उमेदवार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांना रेकॉर्ड ब्रेक आघाडीने निवडून देण्याचे आवाहन सौ अनिताताई जगताप ह्या सर्व मतदारांना करीत आहेत.