भारत हा लोकतांत्रिक देश आहे भारतीय राज्यघटनेने सर्व भारतीयांना स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे.कलम १९ मध्ये अनेक प्रकाराच्या स्वातंत्र्याचा उल्लेख आहे. यातलाच पहिलाच भाग म्हणजे कलम १९ १(अ) मध्ये भारताच्या सर्व नागरिकांना भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य मर्यादित आहे का? अर्थातच नाही कलम १९ च्या दुसऱ्या भागात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बंधन सांगितले आहेत.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे राजकीय मतभेद वैविध्यपूर्ण संस्कृतिक, अभिव्यक्ती सर्जनशीलता आणि नवकल्पना तसेच स्व- अभिवक्तिद्वारे वैयक्तिक महत्त्वाच्या विकासासाठी मूलभूत आहे. भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे राजकीय पक्षात उंच भरारी घेत आहेत. भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि राजकारणाचा थेट संबंध आहे. ज्या भारतीय राज्यघटनेने कलम १९ मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य नमूद केले आहे. आता त्यात अभिव्यक्तीचा खून तर होत नाही ना?
खून म्हणजे नक्कीच त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर आणि त्याच्यावर लावलेली असंविधानिक बंधने. अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे आज आपल्याला म्हणजेच तो कोणत्याही धर्माचा किंवा जातीचा असला तरी त्याला भाषणाद्वारे मत मांडायचा अधिकार आहे. आणि तोच अधिकार आज कुठेतरी धुळखात पडलेला आहे. आज काही संघटना जरी सत्य माहितीचा प्रचार करत असले तरी त्यांना आज अभिव्यक्ती स्वातंत्र्यची भीती वाटत आहे. जो आज सत्य बोलून मानवाचे प्रवचन व प्रबोधन करत असतो त्याच्याच जीवाला धोका असतो. मानवाने आज जणू बुद्धीचा उपयोग करनेच सोडूनच दिला आहे. जो सत्य बोलत असतो त्यालाच आज अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा धोका असतो जो खोटं बोलून खोटा इतिहास किंवा खोटी माहिती समाजामध्ये पसरवत असतो त्याला मात्र त्याची भीती नसते. जणू भारतातल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खून झाला आहे. यावरून हे सिद्ध होतो की भारतात आज अभिव्यक्ती स्वातंत्रच नाही. ज्यावेळी एखादा नेता भाषण करतो आणि भाषणामध्ये सर्रास खोटा इतिहास ज्याला काही पुरावा नसतो असा इतिहास समाजात पसरवत असतो तेव्हा त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे.आणि एखाद्या हुशार जाणकार अभ्यासू व्यक्ती ज्या वेळी खरा इतिहास सांगतो असतो त्यावेळी त्या व्यक्तीचा द्वेष केला जातो. जो इतिहास हा सत्य असेल तर आपण सर्वांनी देखील सत्य सोबत उभे राहणे हाच खरा संविधानिक धर्म आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची चिकित्सा करणे आज गरजेचे होऊन बसले आहे. ज्यावेळी मानव त्याच्या विचाराने आणि बुद्धीने परिपक्व होतो त्यावेळी ते समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा प्रकट करतो. आणि ज्यावेळी तो सत्य सांगतो त्यावेळी त्याला मारण्याची धमकी येत असते. यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा आज प्रत्येक मानव हा भाषण करण्यात घाबरत आहे राजकारण करण्यात घाबरत आहे. याचे मूळ कारण तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ही झालेली निर्गुण हत्याच आहे. काही ग्रंथांसारखे तर नाही हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य की एखादा विशिष्ट समाजाला दिले आहे.तर ते प्रत्येकांना दिले आहे. संविधानानुसार त्याचे पालन करणे आज गरजेचे आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी होणारी ही छेडछाड मूकपणे पाहनी हा आज मानव करत आहे असे असले तरी काही संघटन त्याचा विरोध करून आपले मत निर्भीडपणे मांडत आहेत. तर प्रत्येक मानवाने त्याच्या विवेक बुद्धीच्या वापराने यावर चिकित्सा करणे गरजेचे आहे असे मी समजतो.
*लेखन :
गणेश नंदकुमार वर्णेकर
छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा - मो. 9359039659
*संकलन*
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111