श्रीरामपूर / प्रतिनिधी:
दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी होत असलेल्या महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीमधे वृद्ध,वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करून आपल्या मतदानाचा हक्क बजावत शंभर टक्के मतदानाची नोंद करावी, त्याचबरोबर आपला हक्क आणि आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावत असताना निपक्ष:पातीपणे लोकशाहीला चालना देण्यासाठी आपण मतदान करणे आवश्यक तथा गरजेचे आहे असे प्रतिपादन समाज कल्याण विभाग दिव्यांग व्यवस्थापन नोडल अधिकारी संजय साळवे यांनी वयोवृद्ध व दिव्यांग मतदार प्रबोधन अभियान कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
अपंग सामाजिक विकास संस्था श्रीरामपूर, आसान दिव्यांग संघटना महाराष्ट्र,जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग दिव्यांग कक्ष अहमदनगर आणि निवडणूक विभाग प्रांत कार्यालय श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दत्तनगर येथील युप्रेसिया कारुण्य भवन वृद्धाश्रम या ठिकाणी वयोवृद्ध व दिव्यांग मतदार जनजागृती अभियान आणि फराळ वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमासाठी अपंग सामाजिक विकास संस्थेच्या सचिव वर्षा गायकवाड, निवडणूक शाखा मतदार केंद्र स्तरीय अधिकारी अनुप खरात, आसान दिव्यांग संघटनेचे राज्य समन्वयक चंद्रकांत त्रिभुवन,दत्तनगर शाखा उपाध्यक्ष महेंद्र दिवे,डि पाॅल पब्लिक स्कूलचे जनसंपर्क अधिकारी अशोक पवार, स्कॅश गोल्ड मेडल्स प्राप्त सहर्षा साळवे,पारनेरचे कार्यकर्ते सुनिल शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वृध्दाश्रम संचालिका सि.ग्लोरिया होत्या याप्रसंगी डि पाॅल पब्लिक स्कूल सी.बी.एस. सी.ची विद्यार्थीनी कु.सहर्षा साळवे हिने उपस्थित नागरिकांना राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी मतदार शपथ घेतली,अपंग सामाजिक विकास संस्थेच्या सचिव वर्षा गायकवाड यांनी वयोवृद्ध व दिव्यांग मतदारांकरिता असणाऱ्या सोयी सुविधा संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पास्टर चंद्रकांत त्रिभुवन यांनी ईशस्तवन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहर्षा साळवे हिने केले तर आभार महेंद्र दिवे यांनी मानले.
वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*संकलन
समता मिडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - ९५६११७४१११